Sanjay Nirupam Vs Sanjay Raut : शिंदे सरकारच्या 'लाडकी बहीण' योजनेवरून दोन्ही शिवसेनेचे 'संजय' आमने-सामने, नेमका आरोप काय?

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : महायुती सरकारने महिला आणि तरुणांसाठी अनेक लोकप्रिय योजनांच्या घोषणा केल्या आहेत. मात्र, सरकारच्या तिजोरीत खडखडाट असतानाही कोट्यवधींच्या योजनांची घोषणा केल्यामुळे विरोधकांनी यावर सडकडून टीका करायला सुरुवात केली आहे.
Sanjay Nirupam, Sanjay Raut
Sanjay Nirupam, Sanjay Rautsarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Shivsena And NCP) दोन भाग झाल्यानंतरची ही पहिलीच विधानसभेची निवडणूक आहे. त्यामुळे ती अत्यंत चुरशीची होणार यात शंका नाही. शिवाय याचे पडसाद आतापासूनच दिसून येत आहेत.

महायुती सरकारने पावसाळी अधिवेशनात राज्यातील महिला आणि तरुणांसाठी अनेक लोकप्रिय योजनांच्या घोषणा केल्या. सरकारच्या तिजोरीत खडखडाट असतानाही सरकारने कोट्यवधींच्या योजनांची घोषणा केल्यामुळे विरोधकांनी यावर सडकडून टीका करायला सुरुवात केली आहे.

अशातच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत चिंता व्यक्त केली. शिवाय राज्यावर कर्जाचा ओझं वाढल्याचंही पवार म्हणाले. पवारांनतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील या योजनेवरुन सरकारवर निशाणा साधला आहे.

तर "लाडक्या भावांना 5 हजार आणि 10 हजार रुपये देणार, आणि लाडक्या बहिणीला फक्त 1500 रुपये ? लाडक्या बहिणीला पण 10 हजार रुपये द्या, तरच त्यांचं घर चालेल. 1500 रुपयांमध्ये लाडक्या बहिणीचं घर चालणार कसं?" असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

Sanjay Nirupam, Sanjay Raut
NCP Vs BJP : "घरचा आहेर, कटू आहे पण...!''; नितीन गडकरींचा 'तो' व्हिडिओ अन् शरद पवार गटाच्या नेत्याचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

राऊतांच्या याच प्रश्नाला आता शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "पत्राचाळ घोटाळ्यात तुरुंगाची हवा खाऊन आलेले लोक राज्यातील गोरगरीब महिलांसाठी सुरु केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'ला विरोध करत आहेत", असं म्हणत निरुपम यांनी राऊतांवर टीका केली आहे.

Sanjay Nirupam, Sanjay Raut
Supriya Sule : भाजपची विधानसभेची तयारी; सुप्रिया सुळेंनी कळीच्या मुद्यावरच ठेवलं बोट, म्हणाल्या...

संजय निरुपम यांनी एक्सवर पोस्ट करत राऊत यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं, "जे लोक पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी आर्थर रोड कारागृहात शिक्षा भोगून आले आहेत. ते महाराष्ट्रातील गरीब महिलांसाठी सुरू केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'ला विरोध करत आहेत.

त्यांना आधी खिचडी घोटाळ्यात गोर-गरीब जनतेचे कोट्यवधी रुपये खाल्ले ते सरकारला कधी परत करणार? हे विचारायला पाहिजे. शिवाय सरकारला सल्ले देण्याऐवजी अखंड भ्रष्टाचारात बुडालेल्या घोटाळेबाजांनी त्यांच्या पापाचा हिशेब द्यावा." अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा दोन्ही शिवसेनेचे संजय आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com