Brij Bhushan Sharan Singh And Raj Thackeray News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दोर्याला कडाडून विरोध केल्यानंतर उत्तर प्रदेशचे भाजपा खासदार बृजभूषण सिंह चांगलेच चर्चेत आले होते. त्यांनी ठाकरे हे दबंग नाही तर उंदीर आहेत अशी टीका देखील त्यांनी केली होती. आता हेच बृजभूषण सिंह( Brij Bhushan Singh) हे महाराष्ट्र दौर्यावर येत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे सिंह यांच्या महाराष्ट्र दौर्यावर काय भूमिका घेणार याविषयी चर्चांना उधाण आलं होतं.
मात्र, याचदरम्यान बृजभूषण सिंह यांनी मनसे आणि राज ठाकरेंचे आभार मानले आहेत. तसेच त्यांच्याशी असलेला विरोध हा तात्विक होता असं विधान देखील केलं आहे.
बृजभूषण सिंह हे महाराष्ट्र दौर्यावर येणार आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सिंह म्हणाले, राज ठाकरेंना(Raj Thackeray) माझा तात्विक विरोध होता. मी त्यांच्यासमोर एक अट ठेवली होती की, संतांची, जनतेची, पंतप्रधानांची माफी मागा. आणि आपल्याकडून चूक झाल्याचं मान्य कऱण्यास मी सांगितलं होतं. माझ्या दौऱ्याला ते विरोध करणार नसतील तर चांगली गोष्ट आहे. मनसेने घेतलेल्या भूमिकेसाठी मी त्यांचा आभारी आहे असं बृजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे.
तसेच आम्ही तर कुस्तीमधील पैलवान आहोत. संपूर्ण देशभर आम्ही प्रवास करत असतो. महाराष्ट्रातील कोणत्याही पैलवानाने आपण भेदभाव करत असल्याचं सांगावं. आम्ही त्यांना प्रेम देतो, सन्मान करतो. त्यांची प्रत्येक गरज पूर्ण करतो असंही सिंह यांनी यावेळी सांगितले.
पुण्यात २० ते २५ डिसेंबर या कालाधीत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्प प्रतिष्ठान याचे आयोजन करणार आहे. बृजभूषण सिंह हे मागील दहावर्षांपासून राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. यामुळे ते या कुस्ती कार्यक्रमासाठी पुण्यात येत आहेत. यावेळी शरद पवार आणि बृजभूषण सिंह हे व्यासपीठावर एकत्र उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
बृजभूषण यांच्या महाराष्ट्र दौर्यावर राज ठाकरेंचा आदेश...
उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांनी कुठलंही वक्तव्य करु नये असे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
बृजभूषण सिंह नेमकं काय म्हणाले होते.?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाच जूनला अयोध्या दौर्याची घोषणा केली होती. मात्र, या दौर्याविरोधात उत्तर प्रदेशचे भाजपा खासदार बृजभषण सिंह यांनी आक्रमक भूमिका घेत तीव्र विरोध केला होता. राज ठाकरेंनी माफी मागितल्याशिवाय त्यांना उत्तर प्रदेशात पाय देखील ठेवू देणार नसल्याचा इशारा दिला होता.
राज ठाकरे दबंग नाही तर उंदीर आहेत. ते पहिल्यांदा बाहेर येत आहेत. माझं म्हणणं ऐकलं नाही, माफी मागितली नाही तर मी वचन देतो की,उत्तर प्रदेश, बिहार आणि छत्तीसगड सक्षम आहेत. ते आयुष्यात कधीच येऊ शकणार नाहीत. मला मराठ्यांचं समर्थन आहे असा दावाही यावेळी त्यांनी केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.