Mumbai Municipal Corporation Budget 2023 : मुंबई महापालिकेचा 2023-24 साठीचा अर्थसंकल्प आज (दि.4 फेब्रुवारी) सादर केला जाणार आहे. हा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल सादर करणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांचे लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागले असून अर्थसंकल्पामधून मुंबईकरांना नेमकं काय मिळणार हे आज समजणार आहे.
आगामी निवडणुकीच्या तोंडावरच हा अर्थसंकल्प सादर होत आहे. तसेत सध्या मुंबई महापालिकेवर प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या माध्यमातून नेमकी काय घोषणा होतात हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शाळा, आरोग्य, रस्ते आणि स्वच्छतेसाठी निधीची मोठ्या प्रमाणात तरदूत मिळण्याची शक्यता आहे. या बरोबरच मुंबई महापालिका अर्थसंकल्पामध्ये सुशोभिकरण प्रकल्प, प्रदुषण नियंत्रण,आरोग्य व्यवस्थेसाठी विशेष पॅकेज मिळण्याची देखील शक्यता आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. हे बजेट सादर होण्याआधीच राजकारण तापलं आहे. तर अर्थसंकल्पाच्या आधी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी एक प्रस्ताव दिला आहे.
या प्रस्तावामध्ये त्यांनी म्हटलं की, अर्थसंकल्पासाठी प्रशासकाने आस्थापन अंदाजपत्रकात पुढे जावे तसेच सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांना निधी देण्यात यावा. याबरोबरच निवडून आलेले प्रतिनिधी, नगरसेवकर, महापौर आणि समिती प्रमुखांच्या अनुपस्थितीत कोणतेही नवीन प्रकल्प हाती घेऊ नयेत, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.