Madhuri Misal : कसब्याची जबाबदारी माधुरी मिसाळांकडे; निवडणूक बिनविरोध करून चमत्कार करणार की लढून जिंकणार !

Pune BJP News : निवडणुकीची जाबाबदारी यशस्वी करून दाखवणार का?
Madhuri Misal
Madhuri MisalSarkarnama
Published on
Updated on

Kasaba By-Election : कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळं त्या दोन्ही जागांवर आता पोटनिवडणूक लागली आहे.

त्या दोन्ही जागांवर कुणी लढायचं, याबाबत मुंबईत महाविकास आघाडीची (MVA)बैठक झाली. त्यानुसार ते उद्या उमेदवाराबाबत घोषणा करणार आहेत. दरम्यान भाजपने या दोन्ही जागांवर जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपने कसबा मतदार संघाच्या प्रभारी म्हणून आमदार माधुरी मिसाळ यांच्यावर जबाबदारी सोपविलेली आहे.

दरम्यान परंपरेनुसार निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुणे शहर भाजपच्या वतीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि पुण्यातील सर्वपक्षांच्या शहर अध्यक्षांना पत्र लिहून कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केलेलं आहे. त्याला मात्र यश आल्याचं दिसून येत नाही. त्यामुळं आता कसबा मतदार संघातून जोरदार टक्कर होण्याची चिन्हं आहेत.

Madhuri Misal
Satyajit Tambe News : सत्यजीत तांबेंच्या विजयानंतर काँग्रेसची मवाळकीची भूमिका?

माधुरी मिसाळ (Madhuri Misal) या पुण्यातील पर्वती (Parvati) विधानसभा मतदारसंघातून त्या भाजपकडून सलग तिसऱ्यांदा आमदार आहेत. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. तसेच त्यांचा सर्व पक्षातील प्रमुख नेत्यांसह पदाधिकाऱ्यांशी चांगले संबंध आहेत. त्यातून त्यांना कसब्यातील निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. दरम्यान भाजपकडून तसा प्रयत्न झालाय, मात्र त्यांना यश आलेलं नाही. त्या पार्श्वभूमीवर आता मिसाळ यांना पुन्हा प्रयत्न करावे लागणार आहेत.

बिनविरोध निवडणुकीसाठी त्यांच्या प्रयत्न यशस्वी झाले नाही तर निवडणुकीची रणनिती आखावी लागणार आहे. कसब्यातील मतदरांचं गणित जुळविण्यासाठी त्यांना स्थानिक पदाधिकाऱ्यांची मोट बांधावी लागणार आहे. पक्षांतर्गत असेलेले वाद कमी करून त्याचा उमेदवारास कसा फायदा होईल, यादृष्टीनं पावलं उचलावी लागणार आहेत.

Madhuri Misal
Pune Politics News : भाजपाचे उमेदवार ठरल्यानंतरच काँग्रेस-राष्ट्रवादी पत्ते उघडणार!

भाजपने कसब्यात केलेल्या सर्व कामांचा लेखाजोखा घेऊन त्यांना मतदरांपुढे यशस्वीपणे मांडण्याचा प्रयत्न करवा लागेल. निवडणुकीत यश मिळविण्यासाठी त्यांना विविध सभांचं आयोजन करावं लागणार आहे. यासाठी त्यांना आपल्या पदाधिकाऱ्यांना योग्य जबाबदाऱ्या द्याव्या लागणार आहेत. यातून नाराजी ओढावणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागणार आहे.

राज्यात निधन झालेल्या जागी निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा आहे. मात्र पंढरपूर-मंगळवेढाची निवडणूक त्याला अपवाद ठरली. त्या पार्श्वभूमीवर ही कसबा पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आव्हान माधुरी मिसाळ यांच्यासमोर होतं. आता निवडणूक बिनविरोध होत नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

त्यामुळं आता पक्षानं दिलेला उमेदवार निवडून आणण्याचंही आव्हान मिसाळ यांच्यापुढं आहे. त्यासाठी आखण्यात येणारी सर्व रणनिती मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे. यातून आता मिसाळ या भाजपने दिलेले जाबाबदार कशी पार पाडतात, याकडे राजकिय जाणकारांचे लक्ष लागलं आहे.

Madhuri Misal
Teacher Graduate Election : 'बारामती जिंकण्याचे स्वप्न बघणारे स्वतःच्या बालेकिल्ल्यात पराभूत' !

दरम्यान मिसाळ यांची यशस्वी कारकीर्द पाहता भाजपने त्यांच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या सोपलेल्या आहेत. त्या त्यांनी आजपर्यंत सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे पेलल्या आहेत. सध्या त्यांच्याकडे भाजपने कसबा विधानसभेच्या पोटनिवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविली आहे.

मिसाळ यांनी यापूर्वी भाजपच्या विधानसभा प्रतोदपदाची, सार्वजनिक उपक्रमक समिती, महिला व बालकल्याण समिती, लोकलेखा समितीवरही त्या सदस्यापदाची जाबाबदारी पेलली आहे. तसेच त्यांच्याकडे २०१९ मध्ये भाजपच्या पुणे शहराध्यक्षपदाची जबाबदारीही देण्यात आली होती. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभारीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com