Chinchwad By-Election : कुंटुंबातील वादाच्या चर्चेवर जगतापांच्या मुलाची भावनिक पोस्ट!

Chinchwad By-Election : जगातली कोणतीही शक्ती आम्हाला....
Chinchwad By-Election | Laxman Jagtap
Chinchwad By-Election | Laxman JagtapSarkarnama

Chinchwad By-Election : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनाच उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. पण दुसरीकडे जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे ही बोलले जात आहे. आता उमेदवारीवरून जगताप कुटुंबातच वाद सुरू आहे का? अशी चर्चा सुरू सुरू होती. आता या चर्चेवर शंकर जगतापांच्या मुलाने भावनिक पोस्ट टाकली आहे.

मुलगा आदित्य जगतापने भावनिक पोस्ट टाकत या चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हाला जगातील कोणतीही शक्ती वेगळे करू शकत नाही, आम्ही शेवटपर्यंत एक आहोत, असे म्हणत आदित्यने आपल्या कुटुंबियांसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत.

जगताप कुटुंबातील कुटुंबातील सर्व सदस्यांचे फोटो फेसबुक पोस्टमध्ये टाकले आहेत. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाला आता एक महिना झाले असताना जगताप कुटुंबात वाद असल्याचे बोलेले जात होते. याच चर्चांच्या पार्श्वभूमीवर आदित्य यांनी ही भावनिक पोस्ट केली आहे. “जगातील कोणतीही शक्ती आम्हाला वेगळे करू शकत नाही, आम्ही शेवटपर्यंत एक आहोत.” असे म्हणत आदित्य यांना वादावर पडदा टाकला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com