मोदींच्या 'ड्रिम प्रोजेक्ट' ला शिंदे सरकारकडून हिरवा कंदील ; बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा

नव्या शिंदे सरकारमुळे मोदींच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला गती मिळणार आहे.
Narendra Modi, Eknath Shinde
Narendra Modi, Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अनेक मोठे निर्णय घेण्यास सुरवात केली आहे. आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारने (Eknath Shinde) बुलेट ट्रेनबाबत (bullet train) महत्वाचा निर्णय घेतला आहे. (bullet train latest news)

मोदींचा महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला आवश्यक सर्व परवानग्या दिल्या आहेत. बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारने आवश्यक मंजुरी दिली आहे.

ठाकरे सरकारकडून रखडलेल्या बुलेट ट्रेनच्या (Bullet Train) प्रकल्पाला गती मिळणार आहे. बुलेट ट्रेनच्या सर्व कामांनी मंजुरी देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. राज्यात शिंदे सरकार सत्तारुढ झाल्यामुळे बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा होणार आहे. नव्या शिंदे सरकारमुळे मोदींच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला गती मिळणार आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी महाराष्ट्रात सुमारे १५० हेक्टर क्षेत्राचं अधिग्रहण करणं गरजेचं आहे. अद्याप या कामाने वेग घेतलेला नाही. काही दिवसांपूर्वी बुलेट ट्रेन प्रकल्पाची पाहणी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच केली होती. त्यावेळी बुलेट ट्रेन प्रकल्प रखडल्याने महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. मात्र, राज्यात आता भाजपप्रणित शिंदे सरकार आल्याने बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग मिळण्याची शक्यता आहे.

Narendra Modi, Eknath Shinde
ठाकरे सरकारने बंद केलेली आणीबाणीतील बंदीजनांची पेन्शन योजना पुन्हा सुरु

बुलेट ट्रेनमधील खर्चाचा राज्याच्या वाट्याला येणारा खर्चही शिंदे सरकार करणार आहे. ठाकरे सरकारच्या काळात बुलेट ट्रेनला मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याने बुलेट ट्रेनचे काम मंदावले होते. या प्रकल्पावर शिवसेनेची काय भूमिका असणार आहे याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

  • मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील दादरा-नगर हवेलीतील १०० टक्के, गुजरातमधील ९८.७९ टक्के आणि महाराष्ट्रातील ७१ टक्के जागेचे संपादन पूर्ण झाले आहे.

  • प्रकल्प खर्चवाढ टाळण्यासाठी प्रकल्पासाठी ८५ टक्के जमीन अधिग्रहित केल्याशिवाय प्रत्यक्ष काम न करण्याचा रेल्वे मंडळाकडून सूचना देण्यात आल्या होत्या.

  • राज्यात बुलेट ट्रेनच्या कामाला अडथळा निर्माण झाला होता. मात्र,आता राज्यात भाजपप्रणित शिंदे सरकार आल्याने बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मार्ग मोकळा होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com