मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांची आज मंत्रिमंडळ बैठक झाली. बैठकीत जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Eknath Shinde news updates)
पेट्रोल-डिझेल स्वस्त, बाजासमिती निवडणुकीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार, याच बरोबर आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्यांना (emergency protesters) पुन्हा पेन्शन मिळणार असल्याचा महत्वाचा निर्णय शिंदे सरकारनं घेतला आहे.(emergency protesters pension scheme)
आणीबाणीच्या कालावधीत तुरुंगवास भोगलेल्यांना पेन्शन देण्यात येत होती. ही योजना महाविकास आघाडी सरकारने 31 जुलै 2020 रोजी बंद केली. शिंदे सरकारने सत्तेत येताच ही पेन्शन योजना पुन्हा सुरु केली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आणीबाणी काळात अनेक नागरिक जेलमध्ये होते, यात जनसंघाचे लोक अधिक होते. आम्ही घेतलेला हा राजकीय निर्णय नाही.सत्याग्रहात ज्यांनी सहभाग घेतला त्यांच्यासाठी हा निर्णय आहे. माझे वडीलही आणीबाणीमध्ये जेलमध्ये होते. गेल्या सरकारमध्ये काँग्रेस होती, त्यांच्या दबावामुळे ठाकरे सरकारने ही पेन्शन योजना थांबवली होती,"
1975 ते 1977 या कालावधीत देशात झालेल्या आणीबाणीच्या कालावधीत ज्या सत्याग्रहींनी तुरुंगवास सोसला, अशा सर्व सत्याग्रहींचा यथोचित गौरव करण्याच्या दृष्टीने त्यांना पेन्शन देण्याचा निर्णय तत्कालीन फडणवीस सरकारने घेतला होता, पण ठाकरे सरकारने तो निर्णय रद्द केला होता.
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारने सरपंच व नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार दिला होता. पण ठाकरे सरकारने हे दोन्ही निर्णय बदलले होते. त्यावर भाजपकडून जोरदार टीकाही करण्यात आली होती. नागरिकांना आज मध्यरात्री 12 वाजेपासूनच पेट्रोल 5 रुपये, तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त मिळेल, अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.