Jayant Patil On Election Commission: पक्षात फूट पडली नसल्याचे सांगूनही सुनावणीसाठी बोलावलं; जयंत पाटलांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

NCP Crisis : राष्ट्रवादीतील दोन्ही गटांमधील संघर्षावर येत्या 6 ऑक्टोबरला निवडणूक आयोगात सुनावणी होणार
Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. पक्षात दोन गट निर्माण झाले असून अजितदादांचा गट सत्तेत तर शरद पवारांचा गट विरोधी पक्षात आहे. मात्र, काही नेते सोडले तर कोणता आमदार कोणत्या गटात आहे, याचे चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणतीही फूट पडली नसल्याचा दावा पक्षातील काही नेते करत आहेत.

असे असले तरीही निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीत फूट पडल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांना ६ ऑक्टोबरला सुनावणीसाठी बोलावले आहे. यावरून आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगावरच शंका उपस्थित केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडलेली नाही. बोलण्यासाठी वेळ द्यावा, अशी विनंती शरद पवारांनी आयोगाकडे केली होती. पण तरी देखील फूट पडल्याचे निश्चित करत निवडणूक आयोगाने सुनावणीसाठी बोलावलं आहे, असा गंभीर आरोप जयंत पाटलांनी माध्यमांशी बोलताना केला.

Jayant Patil
Rohit Pawar on Ajit Pawar Group : पडळकरांच्या टीकेनंतर अजितदादांना नेते मानणारे मोठे नेते गप्प का ? रोहित पवारांना संशय

"शरद पवारांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या उत्तरात सांगितले होते की, राष्ट्रवादीमध्ये कोणताही वाद नसून मला कुणीही विरोध केलेला नाही. हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये माझी अध्यक्षपदी निवड झालेली आहे. यासह अजून काही महत्वाचे मुद्दे शरद पवार यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात मांडले होते", असं जयंत पाटील म्हणाले.

राष्ट्रवादीमध्ये कोणताही वाद नसल्याने जो पत्रव्यवहार झाला, त्याबाबत भेटण्यासाठी वेळ शरद पवारांनी मागितली होती. पण आयोगाने वेळ दिला नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद असल्याचे ठरवत सुनावणीसाठी ६ ऑक्टोबरला बोलावलं. पण असे न करता बाजू मांडण्यासाठी एक संधी देणं आवश्यक होतं, असंही यावेळी जयंत पाटील म्हणाले. दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गटांमधील संघर्षावर येत्या 6 ऑक्टोबरला निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

Edited By- Ganesh Thombare

Jayant Patil
Rohit Pawar on Ajit Pawar Group : पडळकरांच्या टीकेनंतर अजितदादांना नेते मानणारे मोठे नेते गप्प का ? रोहित पवारांना संशय

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com