मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सुरक्षेत मोठी त्रुटी राहिल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री ठाकरे आज संध्याकाळच्या सुमारास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राजभवनावर गेले होते. तिथून परतत असताना त्यांच्या ताफ्यात अचानक एक अनोळखी कार घुसली. या प्रकारामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. सुदैवाने ताफ्यामधील गाड्यांचा वेग कमी होता, आणि ताफ्यातील वाहन चालकानेही प्रसंगावधान दाखवत ताफा काही क्षणांसाठी ताफा थांबवला. त्यामुळे मोठा अपघात थोडक्यात वाचला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज भवनावरुन 'वर्षा' निवास्थानी परत जात असताना मलबार हिल रस्त्यावर त्यांच्या सुरक्षा ताफ्यामध्ये प्रोटोकॉल तोडून एक गाडी आतमध्ये घुसली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे स्वतः गाडी चालवत होते. सुदैवाने ताफ्यातील सर्वच गाड्यांचा वेग कमी असल्याने ताफा थांबला. संबंधित गाडी पुढे गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा पुन्हा मार्गस्थ झाला. यावेळची सर्व दृश्य कॅमेरामध्ये कैद झाली आहेत.
मात्र यामुळे सुरक्षेव्यवस्थेतील त्रुटी समोर आल्या आहेत. नेते आणि मंत्र्यांचा ताफ्याचा वेग हा जास्त असतो. त्यामुळे असा ताफा ज्या परिसरातून जातो त्या परिसरात पोलिसांकडून सर्व खबरदारी घेतली जाते. याशिवाय मुख्यमंत्री ठाकरे यांना अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था आहे. त्यामुळे पोलिसांनीही या गाडीवर किंवा गाडी मालकावर कोणतीही कारवाई का केली नाही असाही सवाल विचारला जात आहे.
दरम्यान, आज संध्याकाळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी भगतसिंह कोश्यारी यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले. मुख्यमंत्र्यांनी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ व शाल देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही राज्यपालांना शुभेच्छा दिल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.