Sanjay Raut: ठाकरे गटाच्या 'या' नेत्यावरील 'देशद्रोहा'चा गुन्हा मागे

Yavatmal News: पोलिसांनी केली चूक कबूल, न्यायालयाने देशद्रोहाचा गुन्हा मागे घेतला.
Sanjay Raut On PM Narendra Modi
Sanjay Raut On PM Narendra Modi Sarkarnama
Published on
Updated on

Yavatmal: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊतांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा मागे घ्यावा, यासाठी शिवसैनिकांनी पोलिस ठाण्यात धडक देऊन आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी न्यायालयात लेखी उत्तर सादर करत चूक कबूल करीत देशद्रोहाचा गुन्हा मागे घेण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. त्यानंतर राऊतांवरील देशद्रोहाचा गुन्हा मागे घेण्यात आला आहे.

संजय राऊत यांच्यावर यवतमाळमधील पोलिस ठाण्यात देशद्रोहाच्या कलमाअंतगर्त गुन्हा दाखल झाला होता. संजय राऊत यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले होते. देशद्रोहाच्या गुन्हा दाखल झाल्याने राऊत पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता होती.

उमरखेड पोलिसांनी न्यायालयात लेखी उत्तर सादर करीत चूक कबूल करीत FIR मधून देशद्रोहाचे कलम 124(अ) मागे घेतल्याचे न्यायालयाला कळविले आहे. हे कलम मागे घेण्यासाठी शिवसैनिकांनी उमरखेड पोलिस ठाण्यात धडक देत ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा मागे घेतला.

यवतमाळ जिल्ह्याचे भाजपचे समन्वयक नितीन भुतडा यांनी संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी केल्याचा आरोप भुतडा यांनी राऊतांवर केला होता. देशविरोधी लिखाण केल्याचाही आरोप देखील भुतडा यांनी केला होता.

'सामना' वृत्तपत्रातून देशविरोधी लिखाण केल्याचा व देशाच्या पंतप्रधानांची बदनामी केल्याचे भुतडा यांनी तक्रारीत म्हटले होते. त्यानंतर कलम 153_A 505(2) आणि 124 - A नुसार राऊतांवर गुन्हा दाखल झाला होता. यापूर्वी 2022 मध्ये पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. तब्बल 102 दिवस संजय राऊत मुंबईच्या आर्थररोड जेलमध्ये होते. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली.

Sanjay Raut On PM Narendra Modi
Drug Mafia Lalit Patil: ड्रग्ज तस्कर ललित पाटीलचा मुक्काम आता आर्थर रोड कारागृहात

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com