Mumbai:ड्रग्ज तस्करी प्रकरणातील ललित पाटील याच्यासह चौघांना आज (सोमवारी) न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ललित पाटील याचा मुक्काम आता मुंबईतील आर्थर रोड कारागृहात राहणार आहे. नाशिक पोलिसांच्या ताब्यात असलेल्या ललित पाटील याच्यासह चौघांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते.
या प्रकरणातील ललित पाटीलसह चार जणांची दहा दिवसांची पोलिस कोठडी आज संपणार होती. चारही जणांना न्यायालयात हजर करण्यात आले. ड्रग्ज तस्करी प्रकरणात ललित हा नाशिक पोलिसांच्या ताब्यात होता.
ललित पाटीलला ड्रग्ज प्रकरणात पिंपरी पोलिसांनी १० डिसेंबर २०२० रोजी चाकणमधून अटक केली होती. त्यानंतर त्याची रवानगी पुण्यातील येरवडा कारागृहात करण्यात आली होती. गेल्या सप्टेंबर महिन्यात अंमली पदार्थांची तस्करी प्रकरणी ललित पाटीलचे नाव पुढे आले होते. पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेत होता. येथून तो पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेला होता. त्याला शोधण्यासाठी पुणे पोलिसांनी दहा पथके तयार केली होती.
ललित पाटील व भाऊ भूषण आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडेला याला १० ऑक्टोबर २०२३ अटक केली होती.गुन्हेगार छोटा राजनशी संबंधित गँगशी ललित पाटील संबंधित होता. छोटा राजनच्या गुंडांशी त्याची तुरुंगात ओळख झाली होती. ड्रग्ज कसे ओळखायचे, त्यांची तस्करी कशी करायची याचं प्रशिक्षण त्याने घेतले होते, असे पोलिस तपासात आढळले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.