राष्ट्रवादीच्या नेत्यावर शिक्षिकेने केला गुन्हा दाखल ; अनैसर्गिक अत्याचाराचा गंभीर आरोप

Manohar Sapte : लग्नाचे आमिष दाखवत,तिच्यावर अनेक वर्षांपासून अत्याचार केल्याचा आरोप सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर आहे.
Manohar Sapte
Manohar Saptesarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : सोलापूरचे माजी महापौर, राष्ट्रवादीचे नेते मनोहर सपाटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एका शिक्षिकेने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या शिक्षिकेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सपाटेंवर खंडणीचा, अनैसर्गिक अत्याचार अन् अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. ( Manohar Sapte latest news)

संस्थेतल्या शिक्षिकेसोबत जवळीक साधत,तिला लग्नाचे आमिष दाखवत,तिच्यावर अनेक वर्षांपासून अत्याचार केल्याचा आरोप सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर आहे. पीडित महिला ही विधवा आहे.

शिक्षिकेने याबाबत एकदा विनयभंगाची तक्रार देण्यासाठी पोलिस ठाणेही गाठले होते, त्यानंतर तिच्यावर दबाव आणत तक्रार मागे घेण्यास सांगितले.तिच्यासोबत लग्नाचे आमिष दाखवत तिच्यासोबत सपाटेंनी शारीरिक संबंध ठेवले.तिने विरोध केल्यानंतर तुला संस्थेतून काढून टाकेन,तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करेन, असे सांगत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Manohar Sapte
MIM कार्यकर्त्याच्या हत्येचा प्रयत्न ; मुंब्र्यातील कार्यालयाची तोडफोड

पिडित महिलेची इच्छा नसतानाही तिच्याकडून राजीनामा लिहून घेतला. निवृत्तीचे पैसे देण्यासाठी व जमिनीच्या व्यवहारातील असे एकूण दहा लाख रुपये जबरदस्तीने घेतले, अशी तक्रार या महिलेने केली आहे.

तिच्या तक्रारीवरून राष्ट्रवादीचे नेते (ncp) मनोहर सपाटे यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. पीडितेने याबाबत विरोध करत गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस स्टेशनला गेल्यानंतर तिला आरोपी सपाटे यांनी गावठी बंदूक दाखवत भावाला आणि त्यांनाही जीवे ठार मारण्याची धमकी देत तक्रार मागे घेण्यास सांगितले, असे फिर्यादीत नमूद आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com