Mumbai Bribe News : दहा लाख लाच मागणाऱ्या पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल...

Crime News : पहिला हप्ता म्हणून पाच लाख रुपये त्याच दिवशी स्वीकारणार असल्याचे म्हटले.
Mumbai Bribe News
Mumbai Bribe News Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील काशिमिरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखा युनिटचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास जयवंत टोकळे यांनी दाखल गुन्ह्यामध्ये जामीन मिळवून देण्यासाठी दहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. तसेच त्याच दिवशी पाच लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारणार असल्याचे पडताळणी कारवाईत निष्पन्न झाल्यावर याप्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तक्रारदारांच्या भावाविरुद्ध विरार पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime News) दाखल झाला असून त्या गुन्ह्याचे तपास अधिकारी टोकळे हे आहेत. त्यांनी तक्रारदारांच्या भावाला दाखल गुन्ह्यामध्ये जामीन मिळवून देण्यासाठी मदत करण्याकरीता 18 मार्च 2024 रोजी दहा लाख रुपयांची मागणी केली.पहिला हप्ता म्हणून पाच लाख रुपये त्याच दिवशी स्वीकारणार असल्याचे म्हटले.

Mumbai Bribe News
Nanded BJP News : अशोक चव्हाणांकडून प्रचार लोकसभेचा अन् तयारी मुलीला आमदार करण्याची...

याच दरम्यान तक्रारदारांनी ठाणे एसीबीमध्ये धाव घेत, दिलेल्या तक्रारीनुसार 27 मार्च रोजी पडताळणी करण्यात आल्यावर सहाय्यक पोलिस (Police) निरीक्षक टोकळे यांनी पाच लाख रुपये स्वीकारणार असल्याचे पडताळणी कारवाईत निष्पन्न झाले. त्यानुसार टोकळे यांच्या विरोधात काशीमीरा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध (सुधारणा सन 2018) कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कार्यवाही पोलीस निरीक्षक एन. बी. थोरात करत आहेत.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com