Maharashtra Election: राज्यात बंडखोरांचा महापूर ; बंडोबांना थंड करण्याचे शिंदे-फडणवीस-पवार यांच्यासमोर मोठे चॅलेंज

Major Challenge for Shinde-Fadnavis-Pawar to Rebels: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात लवकरच बंडोबांबाबत बैठक होण्याची शक्यता आहे.आज रात्री उशिरा तिन्ही नेत्यांमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे.
Ajit Pawar, CM Eknath Shinde, Devendra Fadnavis
Ajit Pawar, CM Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Vidhan Sabha: विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर आता बंडोबांना थंड करण्याचं मोठ चॅलेंज आहे. बंडोबामुळे महायुतीत मिठाचा खडा पडू नये यासाठी प्रमुख नेते प्रयत्नशील आहेत. ज्या ज्या मतदारसंघात बंडखोरी झाली आहे, त्या ठिकाणची माहिती तीनही पक्षाचे प्रमुख नेते घेत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात लवकरच बंडोबांबाबत बैठक होण्याची शक्यता आहे.आज रात्री उशिरा तिन्ही नेत्यांमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे. शिवसेना-भाजपसह राष्ट्रवादी, काँग्रेस आणि इतर पक्षांच्या उमेदवारांनी मुंंबईसह बहुतांश ठिकाणी बंडखोरी केली आहे.

Ajit Pawar, CM Eknath Shinde, Devendra Fadnavis
Nandurbar Politics: नंदुरबारमध्ये 24 अपक्षांनी वाढवलं टेन्शन; जिल्ह्यात 71 उमेदवारांचे 119 अर्ज

मुंबईत बंडखोरी झालेले मतदार संघ पुढीलप्रमाणे -

बोरिवली मतदारसंघ

भाजपचे उमेदवार - संजय उपाध्याय

भाजप माजी खासदार गोपाळ शेट्टी - (बंडखोर)

अंधेरी पूर्व

शिवसेना अधिकृत उमेदवार - मुरजी पटेल

अपक्ष - स्वीकृती शर्मा (बंडखोर)

वर्सोवा विधानसभा

अधिकृत उमेदवार हारून खान

राजू पेडणेकर अपक्ष (बंडखोर)

वांद्रे पूर्व विधानसभा

राष्ट्रवादी काँग्रेस - झिशान सिद्दिकी उमेदवार

शिवसेना- कुणाल सरमळकर अपक्ष (बंडखोर)

धारावी विधानसभा

ज्योती गायकवाड- काँग्रेस उमेदवार

बाबुराव माने - शिवसेना ठाकरे गट (बंडखोर)

भायखळा विधानसभा

शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष-मनोज जामसोतकर

काँग्रेस मधु चव्हाण (बंडखोर)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com