चांदीवाल समितीसमोर सचिन वाझे म्हणाला, मी तर फक्त एक छोटे प्यादे...

चांदीवाल समितीसमोर बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याने हजेरी लावली.
SachinVaze
SachinVaze Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश कैलास उत्तमचंद चांदीवाल यांची एक सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती (Chandiwal Committee) नेमली आहे. या समितीसमोर आज बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sahin Waze) याने हजेरी लावली. त्यावेळी त्याची समितीसमोर साक्ष झाली.

वाझे याला आज चांदीवाल समितीसमोर हजर करण्यात आले. त्यावेळी त्याने तो केवळ एक छोटे प्यादे असल्याचे सांगितले. तसेच, समितीवर पूर्णपणे विश्वास असल्याचेही त्याने स्पष्ट केले. उद्या त्याची उलटतपासणी घेण्यात येणार आहे. वाझे आता उद्या कोणता गौप्यस्फोट करतो, याकडे लक्ष लागले आहे. त्याने स्वत:ला प्यादे म्हटले असल्याने मोठे खेळाडू कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याचे उत्तरही उद्या मिळण्याची शक्यता आहे. तसेच, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचे स्वीय सहाय्यक कुंदन, संजीव पालांडे यांच्या जबाबाचीही उलटतपासणी उद्या होणार आहे.

SachinVaze
परमबीरसिंहांचा ठावठिकाणा कळाला, ते परदेशात नसून भारतातच!

सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील आणि बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यातील संवादाविषयी परमबीरसिंह यांनी सादर केलेला व्हॉटसअॅपवरील मजकूर आणि परमबीरसिंह यांची बदली झाल्यानंतर त्यांनी पत्राद्वारे जाहीर केलेले आरोप याच्या परस्पर संबंधांची शहानिशा ही समिती करीत आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानासमोर स्फोटके असलेली मोटार सापडली होती. याप्रकरणी वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांची राज्य सरकारने बदली केली होती. या बदलीनंतर परमबीरसिंह यांनी थेट गृहमंत्र्यांकडून पैसे वसुलीसाठी दबाव असल्याचा आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली होती.

SachinVaze
सर्वोच्च न्यायालयाचा परमबीरसिंहांना दिलासा अन् महाराष्ट्र सरकार, सीबीआयला नोटीस

चांदीवाल चौकशी समिती अनिल देशमुख, गृह मंत्रालयातील कर्मचाऱ्यांसह या प्रकरणाशी निगडित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही चौकशी करत आहे. या चौकशीत देशमुख अथवा अधिकारी-कर्मचारी दोषी आढळल्यास ही समिती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग किंवा अन्य तपास यंत्रणांकडे हा तपास सोपवण्याची शिफारस करणार आहे. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. तसेच, गृह विभागाशी संबंधित शिफारशीही ही समिती करणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com