चंद्रकांत पाटलांची राऊतांवर टीका : अजितदादा मात्र चांगले नेते

राज्यात निर्माण झालेल्या राजकीय गोंधळावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांनी मत मांडले.
Chandrakant Patil
Chandrakant Patilsarkarnama

मुंबई - राज्यात निर्माण झालेल्या राजकीय गोंधळावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांनी मत मांडले. पत्रकारांनी विचारले असत्या त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांच्यावर टीका केली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांना चांगले असल्याचे सांगितले. BJP News Update

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेत दोन गट पडण्याला भाजप कारणीभूत असल्याचे सांगितले होते. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, त्यांचे म्हणणे काहीही असू शकते. संजय राऊत काहीही बोलतात. त्यामुळे आम्ही लक्ष देत नाही, असा टोलाही त्यांनी राऊतांना लगावला.

Chandrakant Patil
चंद्रकांत पाटील उतरले रिंगणात; ४ आमदारांना सोबत घेवून गुवाहटीला रवाना

ते पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे बरोबर गेलेले आमदार हा शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे. त्यामुळे त्याच्याशी आमचे काहीही देणंघेणं नाही. आमच्या अगदीच रुटीन बैठका सुरू आहेत. मराठीत म्हण आहे, 'कशात काय, फाटकात पाय', अशी स्थिती सध्या राज्यात आहे, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

Chandrakant Patil
संजय राऊतांच्या घरातच शिवसेना फुटली? भाऊ सुनिल राऊत गुवाहटीला जाण्याच्या तयारीत...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोना झाला. यावर त्यांनी सांगितले की, अजित पवार हे चांगले नेते आहेत आणि त्यांना लवकरात लवकर बरे वाटू दे, अशी प्रार्थना करतानाच त्यांनी बंडखोर आमदारांना देण्यात आलेल्या सुरक्षे बाबत सांगितले की, जर गरज असेल तर सुरक्षा देणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. कारण राज्य सरकार सुरक्षा देण्यासाठी कमी पडत आहे, असा आरोपही त्यांनी राज्य सरकारवर केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com