Raj-Uddhav Thackeray Unite : हीच ती वेळ! राज-उद्धव यांना एकत्र आणण्यासाठी नेता नव्हे 'ही' व्यक्ती करतेय प्रयत्न!

Raj Thackeray Uddhav Thackeray Chandrakant Vaidya :माझे दोघे भाचे एकत्र यावे. मी कित्येक वर्षांपासून दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो आहे. याला ईश्वर नक्की प्रतिसाद देईल, असे चंद्रकांत वैद्य यांनी सांगितले.
Uddhav Thackeray, Raj Thackeray
Uddhav Thackeray, Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

MNS Shivsena UBT: महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबत युती करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, मनसेतील काही नेत्यांमध्ये युतीबाबत संभ्रम दिसून येतोय. राज ठाकरे यांनी अजुनही युतीबाबत उघड भाष्य केलेले नाही. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधु एकत्र येणार की नाही याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. मात्र, आता राज-उद्धव यांच्या मामानेच दोन्ही बंधु एकत्र यावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

माझे दोघे भाचे (राज-उद्धव) कत्र यावे. मी कित्येक वर्षांपासून दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो आहे. याला ईश्वर नक्की प्रतिसाद देईल. सध्या चर्चा सकारात्मक दिशेने जात आहे. ईश्वर कधीच प्रयत्न वाया जाऊ देत नाही. ही योग्य वेळ आहे. दोघांनी एकत्र येणे ही घटना मराठी माणूस आणि महाराष्ट्रासाठी हितकारक ठरेल, असे ठाकरे बंधुंचे मामा चंद्रकांत वैद्य (चंदूमामा) यांनी सांगितले आहे.

एकत्र येण्याविषयी मी त्यांच्याशी (राज-उद्धव) थेट कधी बोलत नाही. आमचे जनरल विषय असतात. ते देखील त्यांच्या मनात काय आहे हे कोणालाही बोलून दाखवत नाहीत. योग्यवेळी दोघे मिळून योग्य तो निर्णय घेतील, असे देखील चंदूमामा यांनी सांगितले.

Uddhav Thackeray, Raj Thackeray
Maharashtra Politics : 'आजही मला उद्धव ठाकरेंचे फोन येतात...', एकनाथ शिंदेंचे मंत्री संजय राठोडांचा खळबळजनक दावा

संजय राऊतांचे कौतुक

एकत्र येण्याविषयी दोघांनाही वाटते की या गोष्टीचा गांभीर्याने विचार करायला हवा. मराठी माणसासाठी ही गोष्ट फारच आनंददायक आहे, असे सांगत त्या दोघांनी एकत्र यावेसाठी जास्त प्रयत्न संजय राऊत करत असल्याचे चंदूमामा यांनी सांगितले. तसेच यासाठी त्यांचे कौतुक देखील केले.

नक्की एकत्र येतील...

मला वाटते की गेले सहा महिने, वर्षभर मुंबईत जे चालले आहे ते सहनशिलतेच्या पलिकडे चाललंय. मराठी माणसावर अन्याय होतो आहे. निवडणुका येतील जातील ही गोष्ट वेगळी आहे. ते निवडणुकीसाठी एकत्र येतील हे कारण नसावं. मराठी माणसाची जी इच्छा आहे जो अन्याय होतोय त्यासाठी तर हे दोघे नक्की एकत्र येतील, असे चंदुमामा म्हणाले.

Uddhav Thackeray, Raj Thackeray
BJP Shiv Sena clash : महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर; मंत्री महाजनांनी वादाला फोडलं तोंड, भाजपसाठी काळ वाईट...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com