Bhiwandi Mayor Election: भाजप लागली कामाला! आणखी एका महापालिकेत ‘चंद्रपूर पॅटर्न’

Bhiwandi Municipal Corporation politics: महापौरपदासाठी आवश्यक असलेला बहुमताचा 46 चा आकडा गाठण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि समाजवादी पक्ष यांनी ही महत्त्वपूर्ण राजकीय आघाडी उभारली आहे. पण त्यातून सपचे नगरसेवक बाहेर पडल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
Thane Bhiwandi
Thane BhiwandiSarkarnama
Published on
Updated on

Chandrapur pattern repeat in Bhiwandi: महापालिका निवडणुकीत राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चंद्रपूर पालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीनंतर सत्तास्थापनेचा सस्पेन्स उघड झाला आहे.

भाजपच्या संगीता खांडेकर चंद्रपूरच्या महापौर झाल्या आहेत. या निवडणुकीनंतर भिवंडी - महापौरपदाच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे, येथेही ‘चंद्रपूर पॅटर्न’ राबवण्यासाठी भाजपची धडपड सुरु आहे. भाजपने यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.

भिवंडी महापालिकेत सेक्युलर विचारधारेच्या पक्षांनी एकत्र येत “भिवंडी सेक्युलर फ्रंट” या संयुक्त मंचाची स्थापना केली आहे. महापौर पदासाठी आवश्यक असलेला बहुमताचा 46 चा आकडा गाठण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि समाजवादी पक्ष यांनी ही महत्त्वपूर्ण राजकीय आघाडी उभारली आहे. पण त्यातून सपचे नगरसेवक बाहेर पडल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

भिंवडी महानगरपालिकेत बहुमतासाठी 46 नगरसेवकांची गरज आहे. काँग्रेस 30, राष्ट्रवादी (शरद पवार) 12, समाजवादी पार्टी 6, भाजप 22, शिंदेसेना 12, कोणार्क विकास आघाडी 4, भिवंडी विकास आघाडी 4 व अपक्ष 1 असे पक्षीय बलाबल आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी सपाला उपमहापौरपदाची ऑफर दिली आहे. त्यासाठी दोन दिवसांचे अल्टिमेटम दिले आहे. समाजवादीचाच महापौर हवा, अशी भूमिका अबू आझमी यांनी घेतली आहे. त्यामुळे सेक्युलर फ्रंटमध्ये फुट पडली आहे. भाजप व शिंदेसेनेकडे 34 संख्याबळ आहे.

सत्तास्थापनेस महायुतीला 12 नगरसेवकांची आवश्यकता आहे. भाजपमध्ये दोन गट पडले आहे. त्याचे नेतृत्व नारायण चौधरी व सुमित पाटील हे करीत आहेत. या दोन्ही गटामधील वाद मिटवून त्यांना एकत्र आणणे हे मोठे आवाहन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे आहे.

Thane Bhiwandi
ZP Election: मकरंदआबांचा गड पोखरत शिंदेंसेनेची कूच: राष्ट्रवादीला नडला ओव्हर कॉन्फिडन्स अन् निष्ठावंतांची जिरवाजिरवी

अपक्ष उमेदवार आपल्या गटात आल्यानंतर कोणार्कची संख्या 5 झाली आहे. तर दुसरीकडे सपाचे ६ नगरसेवकही कोणार्कच्या विलास पाटील यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. कोणार्क व भिवंडी विकास आघाडीला सोबत घेऊन भाजप सत्ता स्थापनेचे स्वप्न पाहत आहे. भाजपचे आ. महेश चौघुले आणि कोणार्कचे विलास पाटील यांच्यात वाद असल्यामुळे भाजपसोबत कोणार्क येणार की नाही, हे सांगणे अवघड आहे.

अशा परिस्थितीत कोणार्कची मनधरणी कऱण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू आहे. कोणार्कला बरोबर घेतले तर भिवंडी विकास आघाडीच्या 3 सदस्यांनादेखील भाजप आपल्या गोट्यात वळविण्यास यशस्वी होईल, असे सांगितले जाते, असे झाले तर ‘चंद्रपूर पॅटर्न’ची पुनरावृत्ती होईल, असे सध्याचे चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com