Tanaji Sawant News : तानाजी सावंतांनी काढलेल्या 'त्या' जीआरमध्ये बदल होणार; काय आहे प्रकरण?

Health Department : विद्यमान आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनीच त्याबाबत सूतोवाच केले आहे, त्यामुळे तानाजी सावंतांनी काढलेल्या जीआरमध्ये काय त्रुटी राहिल्या आहेत, याची चर्चा सुरू आहे.
Tanaji Sawant
Tanaji Sawant Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 06 September : मागील महायुती सरकारमध्ये वादग्रस्त ठरलेले आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी काढलेल्या आणखी एका परिपत्रकामध्ये (जीआर) दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्याबाबत खुद्द विद्यमान आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनीच सूतोवाच केले आहे, त्यामुळे तानाजी सावंतांनी काढलेल्या जीआरमध्ये काय त्रुटी राहिल्या आहेत, याची चर्चा सुरू आहे.

शिवसेना नेते तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी आरोग्य मंत्री असताना आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक निर्णय घेतला होता. त्या संदर्भातील शासकीय परिपत्रकामध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे.

आरोग्य विभागात (Health Department) दहा वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा निर्णय तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी घेतला होता, त्या निर्णयाचा फायदा महायुतीला निवडणुकांमध्ये झाला होता. मात्र, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होऊन वर्षे होत आले तरी अद्याप त्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही, त्यामुळे आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे, त्यातूनच राज्यातील कंत्राटी आरोग्य कर्मचारी 19 ऑगस्टपासून बेमुदत संपावर गेले आहेत, त्या संपामुळे राज्यातील रुग्णांचे मात्र हाल होत आहेत.

आरोग्य विभागात दहा वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यासंदर्भात तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी 14 मार्च 2024 रोजी परिपत्रक काढले होते.

Tanaji Sawant
NCP Leader Viral Video : अजितदादांनी राष्ट्रवादीच्या ‘ज्या’ पदाधिकाऱ्याच्या फोनवरून महिला DYSPला धमकावले; त्याचा नशा करतानाचा व्हिडिओ व्हायरल

त्या परिपत्रकानुसार आरोग्य विभागातील मंजूर पदांपैकी 70 टक्के पदे ही सरळसेवेने, तर 30 टक्के पदे ही कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनाने भरण्याचा निर्णय झाला होता. मात्र त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही, त्यामुळे हे कंत्राटी आरोग्य कर्मचारी संपावर गेले आहेत.

जालना येथे आंदोलन करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी भेट घेतली. त्या भेटीदरम्यान टोपे यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना फोन लावला आणि तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी काढलेल्या जीआरची अंमलबजावणी करण्याची मागणी केली.

Tanaji Sawant
Satara Politic's : गोरेंनंतर रणजिसिंह निंबाळकरांबाबतही रामराजे झाले मवाळ; म्हणाले, ‘आम्ही आता काय एकमेकांच्या कॉलरी धरायच्या का?

त्या जीआरमध्ये काही त्रुटी आहेत, त्यात सुधारणा करण्यात येणार आहेत, असे उत्तर आबिटकर यांनी दिल्याचा व्हिडिओ वायरल झाला आहे. त्यामुळे माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या आणखी एका परिपत्रकामध्ये बदल होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com