Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांच्यावर पार पडली हृदय शस्त्रक्रिया! जाणून घ्या हेल्थ अपडेट

Chhagan Bhujbal Health Update : मुंबईतल्या एशियन हार्ट इन्स्टिट्युट इथं त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal Health Update : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर आज हृदय शस्त्रक्रिया पार पडली. मुंबईतल्या एशियन हार्ट इन्स्टिट्युट इथं त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी त्यांना येते काही दिवस कोणालाही न भेटण्याचा आणि केवळ आराम करण्याचा सल्ला दिला आहे, साम टीव्हीनं याबाबत वृत्त दिलं आहे.

Chhagan Bhujbal
Mumbai Police: घायवळनंतर आणखी एका गुन्हेगाराचा प्रताप! बनावट पासपोर्टवर 30 वर्षात 40 हून अधिक परदेश वाऱ्या

अचानक थकवा जाणवू लागला

२८ ऑगस्ट रोजी मंत्रालयात काही बैठका घेतल्यानंतर त्यांना अचानक थकवा जाणवू लागला तसंच छातीत दुखत असल्यानं त्यांना तातडीनं जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर हृदयरोगासंदर्भातील अॅजिओग्राफी ही तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर बायपास सर्जरीचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यानुसार, आज (३ नोव्हेंबर) त्यांच्यावर एशियन हार्ट रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रसिद्ध ह्रदयरोगतज्ज्ञ डॉ. रमाकांत पांडा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून पुढील किमान १५ दिवस पूर्णपणे बेडरेस्टचा सल्ला त्यांना डॉक्टरांनी दिला आहे.

Chhagan Bhujbal
Shushma Andhare: फलटणच्या मृत डॉक्टर महिलेविरोधातील युट्यूबवरील आक्षेपार्ह कंटेन्ट हटवणार! अंधारेंच्या लढ्याला यश

ओबीसींचे मेळावे

मधल्या काळात ओबीसींचे 'आरक्षण बचाव' मेळावे ते घेत होते. नागपूर इथं पार पडलेल्या मेळाव्याला त्यांनी आक्रमकपणे संबोधित केलं होतं. त्यामुळं त्यांची धावपळ वाढली होती. पण आता बरे होऊन ते लवकरच पुन्हा जनतेच्या सेवेसाठी पुन्हा सक्रीय होतील, असं त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचं सुत्रांकडून कळतं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com