Sushma Andhare
Sushma Andhare

Shushma Andhare: फलटणच्या मृत डॉक्टर महिलेविरोधातील युट्यूबवरील आक्षेपार्ह कंटेन्ट हटवणार! अंधारेंच्या लढ्याला यश

Shushma Andhare: फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणी काही मागण्या पोलीस प्रशासनासमोर मांडण्यासाठी ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी फलटण पोलीस ठाण्यासमोर आज ठिय्या आंदोलन केलं.
Published on

Shushma Andhare: फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणी आरोपींवर आरोपपत्र दाखल व्हावं यासाठी मागणीसाठी ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी फलटण पोलीस ठाण्यासमोर आज ठिय्या आंदोलन केलं. यावेळी याप्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनुसार, या पीडित डॉक्टर महिलेच्या संदर्भात युट्यूब चॅनेल्सवर जो काही आक्षेपार्ह कंटेट प्रसिद्ध झाला आहे, तो हटवण्यात येईल असं आश्वासन पोलिसांनी दिलं असल्याची माहिती अंधारे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. त्यामुळं एकाप्रकारे अंधारेंच्या लढ्याला यश आलं असल्याचं बोललं जात आहे.

Sushma Andhare
Dhobi Reservation: मराठा-बंजारांनंतर आता धोबी समाजही वाढणार सरकारची डोकेदुखी! 'या' नोंदीनुसार...

युट्यूबवरचा आक्षेपार्ह कंटेन्ट हटवणार

अंधारे यांनी सांगितलं की, "फलटणमधील मृत डॉक्टर महिलेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न झाला. याचे अनेक व्हिडिओज युट्युब चॅनेल्सवर चालवले गेले त्यासंबंधांनी उपायुक्त खांबे यांनी आपल्याला एक सांगितलं आहे की, ते यासंदर्भात गुगलला आणि युट्यूबला एक पत्र देत आहेत. त्या पत्रावरुन तो जो सगळा आक्षेपार्ह कंटेन्ट पब्लिक डोमेनमधून काढला जाईल, त्यातला एकही कंटेन्ट शिल्लक राहणार नाही. दुसरं असं की, आपल्याला ज्या गोष्टी माहिती आहेत जो तपशील आपल्याकडं आहे, त्यासह आपला एक वकील सोबत ठेवून पीडित डॉक्टरच्या भावाचा जबाब नोंदवला जाईल"

Sushma Andhare
Uddhav Thackeray: आशिष शेलारांनी खरंच फडणवीसांना पप्पू म्हटलं? उद्धव ठाकरेंनी मानले आभार

चाकणकरांवर टीका

दरम्यान, या प्रकरणाची माहिती देण्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर अंधारे चाकणकर यांच्याविरोधात आक्रमक झाल्या आहेत. चाकणकर यांनी पीडित मृत डॉक्टर महिलेचे वैयक्तिक व्हॉट्स चॅटचा उल्लेख करत तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले आहेत. चाकणकर यांनी यापूर्वीही अनेक प्रकरणांमध्ये अशाच प्रकारे भूमिका घेत पीडित मृत महिलांचं चारित्र्यहनन केल्याचा गंभीर आरोपही अंधारे यांनी केला आहे. या प्रकरणांमध्ये पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये घडलेलं महिला अत्याचार प्रकरण, पुण्यातीलच वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण त्यानंतर आता फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरण या प्रकरणांचा अंधारेंनी संदर्भ दिला आहे.

Sushma Andhare
NCP News: रुपाली ठोंबरेंकडून चाकणकरांना संपवण्याची भाषा! नेमका काय आहे वाद

ठिय्या आंदोलन

आज यासंदर्भात फलटणच्या पीडितेला न्याय मिळावा या मागणीसाठी तसंच या प्रकरणातील आरोपींवर आरोपपत्र दाखल व्हावं यासाठी मागणीसाठी फलटण पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचं सुषमा अंधारे यांनी आधीच जाहीर केलं होतं. त्यानुसार आज अंधारे यांनी पीडितेच्या कुटुंबासह आंदोलन केलं आणि तपास अधिकाऱ्यांशी संवाद साधला. आपल्या मागण्याचं चार पानी पत्रही त्यांना सुपूर्द केलं. यानंतर पीडितेसंदर्भातील बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावरुन हटवण्यासाठी प्रयत्न करु असं आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com