Mumbai Police: घायवळनंतर आणखी एका गुन्हेगाराचा प्रताप! बनावट पासपोर्टवर 30 वर्षात 40 हून अधिक परदेश वाऱ्या

Mumbai Police: मुंबई पोलिसांनी या आरोपीच्या अखेर मुसक्या आवळल्या आहेत. त्याला परदेशातून कोट्यवधींचा निधी मिळाल्याचा पोलिसांना संशय आहे.
Nilesh Ghaiwal
Nilesh Ghaiwal
Published on
Updated on

Mumbai Police: पुण्यातील गुंड निलेश घायवळ हा बनावट पासपोर्टवर देशातून फरार झाल्याचं प्रकरण ताज असतानाच आता आणखी एका गुन्हेगाराचा मोठा प्रताप समोर आला आहे. बनावट पासपोर्टवर ३० वर्षात त्यानं तब्बल ४० हून अधिक वेळा परदेश दौरे केले आहेत. मुंबई पोलिसांनी अखेर त्याच्या मुसक्या आवळल्या असून परदेशातून त्याला कोट्यवधींचा निधी मिळाला असल्याचा संशय पोलिसांना आहे.

Nilesh Ghaiwal
Shushma Andhare: फलटणच्या मृत डॉक्टर महिलेविरोधातील युट्यूबवरील आक्षेपार्ह कंटेन्ट हटवणार! अंधारेंच्या लढ्याला यश

कोण आहे हा गुन्हेगार?

मुंबई पोलिसांनी अख्तर हुसैन अहमद या व्यक्तीला अटक करत त्याचा मोठा बनावटगिरीचा पर्दाफाश केला आहे. गेल्या 30 वर्षांत यानं खोट्या पासपोर्टवर 40 पेक्षा जास्त परदेश दौरे केल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी त्याच्याकडून बनावट BARC आयडी, बनावट आधार कार्ड, बनावट पॅन कार्ड आणि अनेक पासपोर्ट जप्त केले आहेत. त्याला इराण, सौदी अरेबिया आणि रशियातून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाल्याचा संशयही पोलिसांना आहे. या परदेशी व्यवहारांचा उद्देश आणि नेटवर्क शोधण्यासाठी मुंबई पोलिसांचा तपास सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com