Chhagan Bhujbal News : "खोटी प्रमाणपत्रे देऊन मराठ्यांचे कुणबीकरण थांबवा" ; भुजबळ पुन्हा कडाडले!

Chhagan Bhujbal News : "खोटे कुणबीकरण हे धोकादायक आहे..."
Chhagan Bhujbal News
Chhagan Bhujbal NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शुक्रे समितीने मराठा आरक्षणासंदर्भात आज आपल्या अहवाल सादर केला आहे. यावर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज मराठा आरक्षणासंबंधी मतप्रदर्शन केले.'खोटे दाखले घेऊन होणारे कुणबीकरण धोकादायक आहे. खऱ्या अर्थाने ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण द्यावे, असे ते म्हणाले. (Latest Marathi News)

Chhagan Bhujbal News
NCP Politics : राष्ट्रवादी काँग्रेसला हवा अल्पसंख्याकांचा 'विश्वास'; युवा मेळाव्यानंतर नजर अल्पसंख्याकांवर

नाशिक (Nashik) येथील कार्यालयात भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "शुक्रे समितीने आज शासनास अहवाल सादर केला आहे. त्या अहवालात काय आहे ते अद्याप समजले नाही. त्यामुळे संपूर्ण अहवाल वाचल्यानंतर त्यावर सविस्तर बोलता येईल. शुक्रे समितीने 15 दिवसांच्या अतिशय विक्रमी वेळेत सुमारे दीड कोटी लोकांचे सर्वेक्षण केले आहे. ही अतिशय महत्वाची बाब आहे. जर इतक्या कमी वेळात सर्वेक्षण होणार असेल तर अजून थोडा वेळ वाढवून जातनिहाय जनगणनेचे सर्वेक्षण देखील पूर्ण करून घेण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chhagan Bhujbal News
Rohit Pawar On Rahul Narwekar : 2024 साली भाजप सत्तेत आल्यावर संविधान राहणार नाही

भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले की, "शासनाने नेमेलेल्या मागासवर्ग आयोगातील सदस्य एक एक कमी होत गेले. पुढे न्यामूर्ती मेश्राम यांना देखील समितीतून शासनाने काढले. याबाबत समाजात चर्चा आहे. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या ही सर्वांची मागणी आहे. माजी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतांना कायदा केला तो टिकला नाही. पुढे देवेंद्र फडणवीस यांच्या काळात कायदा झाला. हा कायदा उच्च न्यायालयात टिकला मात्र सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही. त्यावेळी मराठा समाजाला 12 टक्के आरक्षण देण्यात आले होते. आता ओबीसीमध्ये 17 टक्क्यात 370 हून अधिक जाती असताना खोट्या नोंदी करून कुणबी दाखले दिले जात आहे. सरकारने हे कुणबीकरण थांबविले पाहिजे. तसेच ओबीसी समाजात आलेल्या सर्व कुणबीना स्वतंत्र मराठा आरक्षण देण्यात यावे," असे त्यांनी सांगितले.

Chhagan Bhujbal News
Sharad Pawar Faction : शरद पवार गटांचं मोठं पाऊल; 'या' निकालाविरोधात थेट सुप्रीम कोर्टात धाव

ते म्हणाले की, 'समितीने दाखल केलेल्या अहवालात मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याचे म्हटले आहे. आजही महाराष्ट्रात सर्वच क्षेत्रात मराठा समाज हा प्रथम स्थानावर आहे मग सामाजिकदृष्ट्या मागास कसा असा सवाल निर्माण होतो आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर ओबीसी समाजात मोठी अशांतता पसरेल अशा वेळी त्यांना कुठल्याही नेत्याची सुद्धा गरज राहणार नाही. आज लाखोंच्या संख्येने हरकती नोंदवल्या जात आहेत लोकांमध्ये जागृती आहे. हे सर्व राजकारण्यांनी लक्षात घ्यावे. त्यामुळे माझ्या मनातलं भय मी बोलून दाखवत असल्याचे त्यांनी सांगितले.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com