Bhujbal Vs Jarange : "जरांगे, खरा पाटील असशील तर..." ; भुजबळांनी पुन्हा ललकारले!

Chhaan Bhujbal Vs Manoj Jarane Patil : "जरांगे एवढी तरी अक्कल पाहिजे..."
Bhujbal Vs Jarange
Bhujbal Vs JarangeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मराठा आरक्षणासाठी आर-पारची लढाई पुकारणारे मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात मंत्री छगन भुजबळांनी जोरदार भूमिका घेतली आहे. जरांगेंना भुजबळांनी कठोर शब्दात सुनावले आहे. मंडल आयोगाच्या मुद्द्यावरुन जरांगे आणि भुजबळ यांच्यातील नव्या संघर्षाच्या अंकाला सुरुवात झाली आहे. 'जरांगे तू जर खरोखरच पाटील असशील तर मंडल आयोगाला विरोध करुन दाखव,' असं आव्हान भुजबळांनी जरांगेंना दिले आहे. (Latest Marathi News)

Bhujbal Vs Jarange
OBC Reservation : मराठा योद्धे जरांगे-पाटलांचं मोठं वक्तव्य; ...तर मंडल आयोगाला...

भुजबळ म्हणाले, "जरांगेंमध्ये हिंमत असेल, ते खरे पाटील असतील, तर मंडल आयोगाच्या विरोधात बोलून दाखव, मंडल आयोग संपवूनच दाखव. जरांगेंना एवढी तरी अक्कल असली पाहिजे, ज्या ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मागता, त्याच ओबीसी आऱक्षणाचा निर्माता मंडल आहे. एकीकडे मंडल आयोग संपवतो म्हणता आणि मग इकडे कसे राहणार ओबीसीत? ज्यांना एवढीही अक्कल नाही, त्यांच्याशी काय बोलायचं आहे?" अशा शब्दात भुजबळांनी जरांगेंचा समाचार घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bhujbal Vs Jarange
NCP MLA Disqualification Case: 'नार्वेकरांच्या मनात आमच्या बाजूने निकाल द्यायचे...', जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितले

सरकारच्या अधिसूचनेवरुन संघर्ष -

महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या अधिसुचनेनंतर छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात संघर्ष उभा राहिला आहे. एकिकडे जरांगे पाटील अधिसूचनेबाबत काही दगाफटका झाल्यास आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करुु असा इशारा देत आहेत, तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्यासाठी भुजबळांचा तीव्र विरोध आहे. यावरुन आता संघर्ष उफाळण्याची चिन्हे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com