OBC Leaders Meeting : मोठी बातमी ! ओबीसी समाजाची पुढची रणनीती आज ठरणार; पण भुजबळांची अनुपस्थिती ?

Chhagan Bhujbal : ओबीसी समाजातील सर्व नेते मराठा आरक्षणा विरुद्ध एकवटले आहेत. आज ओबीसी जन मोर्चाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या प्रमुख मागण्या राज्य सरकारने मान्य केल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. ओबीसी समाजावर राज्य सरकार अन्याय करत असल्याचा आरोप ओबीसी नेत्यांकडून करण्यात येत आहे. या बरोबरच राज्यात ओबीसी 'एल्गार मोर्चा' ही काढण्यात येत आहेत. त्यामुळे सध्या मराठा समाज विरुद्ध ओबीसी समाज असं चित्र पाहायला मिळत आहे. (OBC Leaders Meeting in Mumbai)

ओबीसी समाजातील सर्व नेते मराठा आरक्षणा विरुद्ध एकवटले आहेत. आज ओबीसी जन मोर्चाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे. त्यासाठी मुंबईत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी 5 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीला मंत्री छगन भुजबळ अनुपस्थित असण्याची शक्यता आहे. या बैठकीत ओबीसी समाजाची पुढील दिशा, कोर्टातील लढाई यासह आदी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chhagan Bhujbal
Parinay Fuke : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यावरील तोडग्याने राजकीय प्रतिष्ठेत भर

ओबीसी जन मोर्चाच्या राज्यस्तरीय प्रतिनिधींची पुढील दिशा ठरवण्यासाठी ही बैठक असल्याचे सांगण्यात येत आहे. ओबीसी नेते विविध जिल्ह्यात जाऊन सभा घेत आहेत. ओबीसी समाजाला जागरूक करत आहेत. मात्र, आजच्या या होणाऱ्या बैठकीमध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाचा उल्लेख नाही. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

20 तारखेपासून वडेट्टीवारांचा मेळावा

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत त्यांनी विविध विषयांवर ठराव केले. तसेच मंत्री छगन भुजबळ यांना पाठिंबा दर्शवत पुढील रणनीती अखणीला सुरुवात करू, अशी ग्वाही दिली. 5 तारखेपासून राज्यातील सर्व ओबीसी नेते सत्तेतील आणि विरोधातील नेते राज्यभर देवदेवतांचे आशीर्वाद घेत दौरे करणार आहेत. हे दौरे पूर्ण झाल्यावर 20 तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी छगन भुजबळ यांना देखील आमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात ओबीसींचा एल्गार दिसणार आहे.

भुजबळांनी नोव्हेंबरमध्येच दिला होता राजीनामा

छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात आहेत, तरी देखील ते सरकारविरोधात आंदोलन करतात. तेव्हा त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, असे विधान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले होते. त्यांच्या या विधानाला प्रत्युत्तर देताना भुजबळ म्हणाले की, याची काही गरज नाही. मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा 16 नोव्हेंबर रोजीच दिला, असा मोठा गौप्यस्फोट मंत्री छगन भुजबळ यांनी केला.

(Edited By-Ganesh Thombare)

Chhagan Bhujbal
Sanjay Raut : संजय राऊतांनी केली किरीट सोमय्यांची मिमिक्री; म्हणाले, 'एकनाथ शिंदेंकडे हिशोब...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com