Chhagan Bhujbal News : बाळासाहेबांसोबत तुम्ही असं का केले ? भुजबळांनी घेतली पुन्हा उद्धव यांची बाजू; राज ठाकरेंना म्हणाले...

Political News : राज ठाकरेंच्या या टीकेला मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्याच शब्दांत उत्तर दिले. राज ठाकरेंनी हा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारायला हवा होता.
Raj Thackrey Chhagan Bhujbal
Raj Thackrey Chhagan Bhujbal Sarkarnama

Mumbai News : लोकसभा निवडणुकीच्या निमिताने सत्ताधारी व विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण वाढत्या उन्हासोबतच चांगलेच तापले आहे. नेतेमंडळी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सॊडत नसल्याने वातावरण शिगेला पोचले आहे.

कल्याण येथील सभेत बोलताना मनसेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे बाळासाहेब ठाकरे यांना सोडून जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळ बैठकीत बसत होता, अशी जोरदार टीका केली. या त्यांनी केलेल्या टीकेमुळे वातावरण चांगलेच तापले होते. ( Chhagan Bhujbal News )

Raj Thackrey Chhagan Bhujbal
Bhavesh Bhinde Arrested: मोठी बातमी! घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणातील आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक

राज ठाकरेंच्या या टीकेला मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्याच शब्दांत उत्तर दिले. राज ठाकरेंनी हा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारायला हवा होता. बाळासाहेबांची शिवसेना असे म्हणता अन् छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून काय बसला आहात? असा प्रश्न त्यांनी विचारायला हवा.

माझ्याबद्दल ही सर्व मंडळी बोलतात मात्र मी तर एक शिवसैनिक आहे. फार कट्टर नाही असे समजा मात्र तुम्ही तर बाळासाहेबांच्या रक्तातील आहात, असा खोचक सवाल भुजबळ यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज शाळेतून आला नाही म्हणून मातोश्रीवर अनेकजण जेवण करीत नव्हते, असे असताना बाळासाहेबांसोबत तुम्ही असं का केले ? तुम्ही तर इकडे पण असता आणि तिकडे पण असता, पण चला जाऊद्या माझ्या दृष्टीने हा मुद्दा संपला आहे. कारण लोकांना हा मुद्दा फारसा भावला नाही. मी ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंसोबत बसतो व एकनाथ शिंदे यांच्यासोबत बसलो आहे, अशी भूमिका भुजबळांनी मांडली.

मंत्री छगन भुजबळ यांनी राज ठाकरे यांच्या विषयी केलेल्या या वक्तव्यानंतर आता त्यांच्याकडून या टीकेला काय उत्तर दिले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Raj Thackrey Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal News: भुजबळ यांनी भाजपला सुनावले, म्हणाले, कांद्याचा किमान खर्च द्यावा !

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com