Bhujbal On Jarange : 'गुलाल उधळलेल्या जरांगेंचे उपोषण कशासाठी? शिव्याही देऊ लागले'; भुजबळांनी डागली तोफ!

Chhagan Bhujbal On Manoj Jarange Patil : एकीकडे जरांगेंचे उपोषण, तर दुसरीकडे भुजबळांचा हल्लाबोल..
Chhagan Bhujbal On Manoj Jarange Patil
Chhagan Bhujbal On Manoj Jarange Patil Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मराठा आरक्षणासाठी आता आर या पार अशा लढाईसाठी उतरलेले मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. सरकारने आरक्षणासंबंधी काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी, विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेऊन तातडीने मराठा आरक्षण लागू करावे, या आग्रही मागणीसाठी जरांगे उपोषणावर ठाम आहेत. दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री यांनी पुन्हा एकदा जरांगेंवर टीकेची तोफ डागली आहे. (Latest Marathi News)

Chhagan Bhujbal On Manoj Jarange Patil
‘...तेव्हा पा पा पा काढलं’, अजित पवारांचा रोख कुणाकडे ? | Ajit Pawar | Sharad Pawar | NCP |

भुजबळ पत्रकार परिषद घेत म्हणाले, "त्या दिवशी विजयोत्सव साजरा करताना गुलाल उधळला, सगळं झालंच आहे तर आता जरांगेंना उपोषणाची गरज काय? मला असंही वाटतं की, मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या, ही आमची भूमिका पहिल्यापासून आहे. मागच्या दाराने त्यांना कुणबी म्हणून घुसवू नका. सगेसोयऱ्यांची व्याप्ती वाढवू नका." (Latest Political News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chhagan Bhujbal On Manoj Jarange Patil
Ashok Chavan in BJP : अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाने नांदेडमधूनच 'काँग्रेसमुक्ती'ला सुरवात ?

भुजबळ म्हणाले, "जरांगेंना वाटलं असेल 15 तारखेला आरक्षण जाहीर होईल. म्हणून आपण दहा तारखेला उपोषणाला बसूया. त्याचे श्रेय मिळू शकतं असं त्यांना वाटलं, त्यांची समज काय चुकीची नाही. त्यामुळे दुसरा गुलाल उधळण्याचा त्यांचा मानस होता, पण ते काम पूर्ण नाही झालं. पाच-सात दिवस ते पुढे गेलेलं आहे. यामुळे त्यांच्या तब्येतीचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे ते आता शिव्याच द्यायला लागले. मुख्यमंत्री- दोन उपमुख्यमंत्री आणि मला शिव्याच द्यायला लागले," असे भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले.

मराठा समाज संतप्त -

जरांगे-पाटील (Maojn Jarange Patil) याच्या अंतरवाली सराटी (Antarwali Sarati) गावातील उपोषणस्थळी मराठा समाजातील लोक जमू लागले आहेत. जरांगे-पाटील यांच्या जिवाला काही झालं तर थेट मुंबईला जाऊ, असा इशारा इथल्या महिलांनी दिला, तर जरांगेंना त्रास देण्याचा प्रयत्न होतोय, अशाही प्रतिक्रिया येत आहेत. जरांगे-पाटलांची प्रकृती खालावत असताना सरकारकडून मराठा समाजाला आरक्षण देण्याचे ठोस आश्वासन दिले जात नसल्याबद्दलही तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.

(Edited By - Chetan Zadpe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com