Parshuram Uparkar on Nitesh Rane : मंत्री राणेंचा इतिहासाचा अभ्यास कच्चा, ‘RSS’ची स्क्रिप्ट वाचतात; माजी आमदार उपरकर यांचा टोला

Former MLA Parshuram Uparkar BJP Minister Nitesh Rane controversial statement Chhatrapati Shivaji Maharaj history : भाजप मंत्री नीतेश राणे 'RSS'ची स्क्रिप्ट वाचून इतिहासाची तोडमोड करत असल्याची टीका माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली.
Parshuram Uparkar
Parshuram UparkarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics News : भाजप मंत्री नीतेश राणे यांचा हिंदुत्वाचा 'अजेंडा', आक्रमक असा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दलात मुस्लिम नव्हते, इथपर्यंत तो पोचला आहे. त्यावरून राज्यात वाद निर्माण झाला असताना, त्यांच्या चौहू बाजूने टीका होत आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी मंत्री राणे यांच्यासह 'RSS'वर टीका केली आहे.

परशुराम उपरकर म्हणाले, "मंत्री नीतेश राणे (Nitesh Rane) यांचा इतिहासाचा अभ्यास कच्चा आहे. कारण ते इंग्रजी माध्यमातून शिकले आहेत. इतिहासाची तोडमोड करून ते दोन धर्मांमध्ये विनाकारण वाद निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत".

Parshuram Uparkar
ShivSena Holi Festival : ठाकरे अन् शिंदे गट एकत्र; बुरा न मानो होली है!

'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) स्क्रिप्ट पाठवतो आणि मंत्री नीतेश राणे तेच बोलतात. हेच नीतेश राणे काँग्रेसमध्ये असताना 'RSS'बद्दल किती खालच्या पातळीवर जाऊन बोलले आहेत, हे सर्वांना ठाऊक आहे', याची आठवण उपरकर यांनी करून दिली.

Parshuram Uparkar
Kanifnath Yatra controversy : मढी येथील कानिफनाथांची यात्रा पुन्हा वादात; मांसाहारानंतर आता प्रसाद विक्रीला बंदी, नवा वाद पेटण्याची शक्यता

नीतेश राणे इंग्रजी माध्यमातून शिकल्याने त्यांना शिवाजी महाराजांचा इतिहास नव्हता. त्यामुळे त्यांना शिवाजी महाराजांच्या इतिहासाची पुस्तक कुरिअरने पाठवणार आहे, असा टोला माजी आमदार परशुराम उपरकर यांनी लगावला.

नीतेश राणेंचे काय होते विधान

मुस्लिम धर्मीयांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या नीतेश राणेंनी त्यांच्या वादग्रस्त विधानांची मालिका सुरूच ठेवली आहे. शिवरायांच्या सैन्यात एकही मुस्लिम नव्हता, असं म्हणत नीतेश राणे यांनी आपला एक वेगळा इतिहास मांडला आहे. त्यामुळे त्यांच्यावर आता वेगवेगळ्या स्तरांमधून टीका होत असून, पुस्तकांचा संदर्भ देत अनेकांनी त्यांचे हे वक्तव्य खोडून काढत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com