ShivSena Holi Festival : ठाकरे अन् शिंदे गट एकत्र; बुरा न मानो होली है!

ShivSena Uddhav Thackeray Eknath Shinde celebrated Holi festival together Dombivli Thane : मुंबईच्या ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत होळी सणाचे सेलीब्रेशन केले.
Uddhav Thackeray Eknath Shinde 1
Uddhav Thackeray Eknath Shinde 1sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political Leaders Holi : होळी हा रंग, प्रेम आणि वसंत ऋतूचा सण म्हणून, साजरा केला जाणारा लोकप्रिय हिंदू सण आहे. याच दिवशी महाराष्ट्र राज्यातील शिवसेनेचे विरुद्ध टोक एकत्र आले आहेत.

ही किमया घडली आहे, ज्यांनी शिवसेनेत तीन वर्षांपूर्वी बंड केले त्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे बालेकिल्ल्यात! शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष आणि शिंदेंची शिवसेना होळीचा सण साजरा करण्यासाठी एकत्र येत 'बुरा न मानो होली है!', असे म्हणत सेलिब्रेशन केले.

राज्याच्या राजकारणात तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत (Shivsena) बंडाळी करत भूकंप आणला. उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडी सरकार यामुळे कोसळले. यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हं दोन्ही ताब्यात घेतले. उद्धव ठाकरे यांनी संयमाने याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात लढा देत आहे. त्यामुळे पुढं काय निकाल येईल, तो येईल. पण राज्याच्या राजकारणात सध्या दोन्ही शिवसेनेमध्ये टोकांचं राजकारण आहे. संघर्ष पंटत आहे. या दोन्ही पक्षामधील भडका कधी उडेल याचा नेम नाही.

Uddhav Thackeray Eknath Shinde 1
Kanifnath Yatra controversy : मढी येथील कानिफनाथांची यात्रा पुन्हा वादात; मांसाहारानंतर आता प्रसाद विक्रीला बंदी, नवा वाद पेटण्याची शक्यता

राज्यातील महायुती सरकारचे अधिवेशन मुंबईत सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्प सादर केला, त्या दिवशी अधिवेशनाला हजेरी लावली. उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी विधिमंडळ सभागृहाच्या लाॅबीत असतानाच, समोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले, त्यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आले. पण ठाकरे अन् शिंदेंनी एकमेकांकडे पाहिले देखील नाही. एवढं हे राजकीय वितुष्ट अवघ्या महाराष्ट्रानं पाहिले.

Uddhav Thackeray Eknath Shinde 1
Abu Azmi : अबू आझमींचं धुळवडीच्या आदल्या दिवशीच खळबळजनक विधान; म्हणाले, मुद्दाम अंगावर अन् मशिदीवर रंग...

राज्यातील दोन्ही शिवसेनेत राजकीय संघर्ष तीव्र असल्याचे पाहायला मिळते आहे. मात्र होळी सणानिमित्ताने ठाण्यातील डोंबिवली इथं दोन्ही शिवसेना पदाधिकाऱ्यांचा 'भाईचारा' पाहायला मिळाला. शिंदे शिवसेनेचे आमदार राजेश मोरे , ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांनी एकत्रित होळी साजरी केली.

डोंबिवली मोठा गाव येथे गेल्या 25 वर्षांपासून 'एक गाव एक होळी', साजरी केली जाते. या कार्यक्रमाला शिंदे शिवसेनेचे आमदार राजेश मोरे आणि ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते आले होते. यावेळी दोघांनी एकमेकांना रंग लावत होळीच्या शुभेच्छा दिल्या. होळीच्या दिवशी एकमेकांना शुभेच्छा देत दोन्ही बाजूकडून पक्षभेदापलीकडची मैत्री जपल्याचे दाखवले. या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत, साजरी केलेल्या होळी सणामुळे हीच शिवसेना पुन्हा अखंड होईल का? अशा चर्चेला तोंड फुटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com