मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टाळी मागितली? म्हणाले क्षमा करायला...

भारत जैन महामंडळांच्या वतीने आयोजित विश्व मैत्री दिवसाच्या क्षमापना समारोहाला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपस्थित होते.
Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde : मुंबई : शिवसेने (Shivsena) विरोधात भूमिका घेऊन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना धक्का दिला. भाजपच्या (BJP) साथेने त्यांनी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळवली. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन आता अडीच महिन्याचा कालावधी लोटला आहे. दरम्यान, मैत्रीसोबत क्षमा जोडली की सगले वाद मिटतात. असे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. यामुळे अनेकांनी भूवया उंचावल्या आहेत.

भारत जैन महामंडळांच्या वतीने आयोजित विश्व मैत्री दिवसाच्या क्षमापना समारोहाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी त्यांनी जैन साधू आणि साध्वींना अभिवादन करून आशिर्वाद घेतले. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
पॅरिसच्या धर्तीवर बारामतीत 'सिटी सेंट्रल' चौक; शहराच्या वैभवात पडणार भर

ठाकरे सरकार पडल्यापासून शिवसेना आणि शिंदे यांचे एकमेकांवरचे आरोप-प्रत्यारोपांचे वार सुरु आहेत. दोन्हीकडूनही मनोमिलनाचा प्रयत्न अजूनपर्यंत तरी झालेले दिसत नाहीत. मात्र, आज विश्व मैत्री दिवसाच्या निमित्ताने भाषण करताना शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) टाळी देण्यासाठी हात पुढे केला. मैत्रीसोबत क्षमा जोडली की सगले वाद मिटतात, असे म्हणत शिंदे यांनी मनोमिलनाची तयारी दाखवली का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
आता सरकारही गेलं आणि मामाही गेले : हर्षवर्धन पाटलांचा दत्तात्रेय भरणेंना टोमणा

शिंदे यांनी मैत्री दिवसाच्या निमित्ताने ठाकरेंना झाले गेले विसरुन जा, असे अप्रत्यक्षपणे सांगत एकत्र येण्याची साद घातली. मैत्रीसोबत क्षमा जोडली की सगळे वाद मिटतात. मात्र, क्षमा करण्यासाठी मोठे काळीज लागते, असे शिंदेंनी सांगितले. शिंदे यांनी मैत्रीचा चेंडू ठाकरेंच्या कोर्टात ढकलला. यामुळे शिंदे यांच्या मनात काय चालले आहे, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com