Eknath Shinde On Uddhav Thackeray : '' रोकडे बंद झाले की, खेकडे दिसायला लागले...'' ; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर खोचक पलटवार

Monsoon Session News : '' ५० खोक्यावरच त्यांचा डोळा...''
Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीतून शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटावर जोरदार हल्लाबोल केला होता. माझ्या नेतृत्वाखालील सरकार वाहून गेलं नाही. खेकड्यांनी धरण फोडलं अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. याच टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर दिलं. यावेळी विधानसभेत बोलताना शिंदेंनी तुफान फटकेबाजी केली. शिंदेंनी ठाकरेंवर हल्लाबोल करतानाच पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून केल्या जाणाऱ्या दाव्यावरूनही टोला लगावला.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Jitendra Awhad On Shivsena: शिंदेंच्या ठाण्यात ठाकरेंची ताकद वाढवण्याचा जितेंद्र आव्हाडांचा इरादा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदें(Eknath Shinde)नी पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर दिलं. यावेळी विधानसभेत बोलताना शिंदेंनी तुफान फटकेबाजी केली. शिंदेंनी ठाकरेंवर हल्लाबोल करतानाच पृथ्वीराज चव्हाण(Prithviraj Chavan) यांच्याकडून केल्या जाणाऱ्या दाव्यावरूनही टोला लगावला.

शिंदे म्हणाले, गेले वर्षभर सरकार पडणार. मुख्यमंत्री बदलणार. सगळे नवे ज्योतिषी शोधत होते. पृथ्वीबाबाही माझ्या मागे लागले. त्यांचे माझे चांगले संबंध, पण तेही म्हणायला लागले की, नवीन मुख्यमंत्री होणार. मी काही त्यांना विचारलं नाही, कारण ते एखाद्या गोष्टीच्या मागे लागले की, दोन-चार वेळा बोलतात. मग त्यांना कळलं की हे काही नाही, तर ते सोडून देतात असेही ते म्हणाले.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Indapur News: विहीर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत; अजित पवारांची घोषणा

'' रोकडे बंद झाले की...''

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, खेकड्याचा विषय त्यांनी काढला, पण रोकडे बंद झाले की खेकडे दिसायला लागले. खरे खेकडे कोण आहेत. कुणी कुणाचे पाय खेचले हे सर्वांना माहिती आहे. राणेसाहेब असतील, भुजबळ असतील, मनोहर जोशींना तर स्टेजवरुन खाली उतरवलं आणि घरी पाठवले. विजय वडेट्टीवारही तिथे होते. आम्हांला बाळासाहेबांच्या विचारांची शिकवण आहे.

'' ५० खोक्यावरच त्यांचा डोळा...''

आम्हांला बोलता येत नाही असे कुणी समजू नये. आमच्यावर ५० खोक्यांचा आरोप करता, आणि आमच्याकडेच ५० कोटी द्या म्हणून मागणी करता. हे ५० कोटी शिवसेनेच्या खात्यात आहे ना, पण शिवसेना (Shivsena) , धनुष्यबाण कुणाकडे आहे. आज हे पत्र आहे की, तात्काळ ५० कोटी आमच्या खात्यात वर्ग करा. आम्हाला शिव्या द्यायच्या, गद्दार म्हणायचं, खोकेबाज म्हणायचं. मग खरे खोकेबाज आणि धोकेबाज कोण ? असा सवाल देखील शिंदेंनी केला.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Vidhan Parishad : महसूल विभागाचं विधेयक आलं, मात्र विखे पाटील सभागृहात गाढ झोपले होते

आणि मी एक मिनिटही विचार केला नाही आणि म्हटलं त्यांचे पैसे त्यांना देऊन टाका. कारण मी अगोदरच सांगितले होते , मला तुमची संपत्ती, प्रॅापर्टी, मला काहीही नको. बाळासाहेबांचे विचारहीच आमची संपत्ती आहे. आता ते ५० कोटी कुठे गेले, कसे गेले हे आता तुम्ही बघा असेही शिंदे यावेळी म्हणाले.

ज्यांना बाळासाहेबांची पडली नाही, शिवसेनेची पडली नाही, शिवसैनिकांशी काही देणंघेणं नाही त्यांना फक्त पैसे हवेत. त्यांना ५० खोकेवरच त्यांचा डोळा आहे. इतर लोकांनी देखील याचा विचार करावा.

सहन करण्याची देखील एक मर्यादा असते. पण आमचे शिवसैनिक भोळेभाबडे आहेत. आणि त्यांच्या प्रत्येकाच्या वाट्याला हे सर्व आले आहेत. आम्ही जे काही लोक आहोत, ज्यांनी घरावर तुळशीपत्रे ठेवत रक्ताचं पाणी करुन शिवसेना पक्ष बाळासाहेब ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली झाला.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Eknath Shinde In Adhiveshan : अनेक ज्योतिषी आले, भविष्य सांगितलं पण सरकार मजबूत होत गेलं; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर टीका अन् टोमण्यांचा भडीमार

मागील वर्षभर सरकार पडणार-पडणार अशी भाकितं सुरु होती. पृथ्वीबाबा माझे चांगले मित्र आहेत, एकाच तालुक्यातील ते आहेत. परंतू, ते माझ्या मागे लागले होते. नवीन मुख्यमंत्री होणार, असं ते का म्हणाले, हे मी त्यांना विचारलं नाही.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com