Eknath Shinde : विधानभवनाच्या पायऱ्यांवरून मुख्यमंत्र्यांचा पाय घसरला; अन् महाजनांनी...

Girish Mahajan : भाजप नेते गिरीश महाजन पुन्हा ठरले संकटमोचक
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama

Maharashtra Politics : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून (दि.27 फेब्रुवारी) सुरूवात झाली. शिंदे-फडणवीस सरकारचे हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. त्यामुळे या अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

हे अर्थसंकल्पीय अधिवेशन 25 मार्चपर्यंत चालणार असून 9 मार्चला अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आज विधीमंडळाचं कामकाच संपल्यानंतर विधानभवनातून बाहेर येताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्या मैत्रीची एक झलक पहायला मिळाली.

Eknath Shinde
Jaykumar Gore In Budget Session : डॉक्टरांचा सल्ला धुडकावत जयकुमार गोरे ‘वॉकर’च्या साहाय्याने पोचले अधिवेशनाला

नेमकं काय घडलं?

विधानभवनातून बाहेर येत असताना पायऱ्यावरून उतरताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तोल गेला. मात्र, त्यांच्या बरोबर चालणारे भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांना हात देत सावरलं. त्यामुळे गिरीश महाजन हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठीही संकट मोचक ठरले. या प्रसंगाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

दरम्यान, आज देवेंद्र फडणवीस आणि भास्कर जाधव यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. त्यामुळे आता उद्या देखील सभागृहात काय-काय घडतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तसेच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com