CM Shinde On Ganeshotsav : मुख्यमंत्री शिंदेंचा गणेशोत्सवासाठी 'हा' मोठा निर्णय; गणेश मंडळांना होणार फायदा

Eknath Shinde On Ganeshotsav Mandal: मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह अनेक प्रमुख शहरांमध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. पण...
Eknath Shinde News
Eknath Shinde NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी राज्यभरात सुरु आहे. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. घरगुतीसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडूनही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. या गणेशोत्सवासाठी मोठी लगबग सुरु आहे.

मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह अनेक प्रमुख शहरांमध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. पण दरवर्षी गणेश मंडळांना गणेशोत्सवासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या अनेक परवानग्या घ्याव्या लागतात. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Eknath Shinde News
Rashmi Thackeray News : शिंदे गटाच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरेंची 'एन्ट्री'; कल्याण पश्चिम मतदारसंघात जोरदार 'बॅनरबाजी'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सवाच्या धर्तीवर महत्वाची बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीत ज्या गणेश मंडळांनी मागील दहा वर्षात पोलीस आणि प्रशासन यांचे सर्व नियम आणि कायद्यांचे पालन केले आहे. पोलिसांत कुठल्याही तक्रारी दाखल झालेल्या नाहीत अशा मंडळांना मोठा निर्णय जाहीर केला आहे.

या गणेश मंडळांना गणेशोत्सवा(Ganeshotsav) त महापालिका, पोलीस प्रशासनाच्या परवानग्यांसाठी होणारा मनस्ताप सहन करावा लागणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुढील पाच वर्षाकरिता उत्सवाकरिता एकदाच परवानगी देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबतचे अधिकृत ट्विट करत या निर्णयाची माहिती दिली आहे. राज्यातील शेकडो गणेश मंडळांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

गणेशोत्सवासाठी छोट्या मोठ्या गणेश मंडळांना तयारी करताना सजावट, मूर्तीची उंची, मंडप, मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम,उपक्रम, देखावे अशा एक ना भारांभर गोष्टींचे नियोजन करावे लागते. महापालिका, पोलीस प्रशासनाच्या परवानग्यांसाठी कितीतरीवेळा संबंधित विभागाच्या कार्यालयांचे उंबरे झिजवावे लागतात. (Latest Marathi News)

कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित होणार नाही, देखाव्यांमधून कुणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही अशी हमी गणेशोत्सव मंडळांना लिखित स्वरुपात सादर करावी लागते. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयामुळे गणेश मंडळांची ही सगळी तारेवरची कसरत दूर होणार आहे. पण त्यासाठी काही नियम आणि अटींचे पालन करणे बंधनकारक ठरणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Eknath Shinde News
Gokul Dudh Sangh Sabha : टँकर अन् ठेका यापलिकडे सतेज पाटलांना ज्ञान नाही; शौमिका महाडिकांची खोचक टीका

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com