Dombivali : शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन केली. यावेळी शिंदे गटात कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांचाही समावेश होता. यामुळे शिवसेनेत आता शिंदे व ठाकरे असे दोन गट पडले असले तरी कल्याण पश्चिम येथे शिंदे गटाचे वर्चस्व असल्याचे बोलले जाते आहे. शिंदे यांच्या दुफळीनंतर उद्धव ठाकरे शिंदे यांच्या ठाण्यात येऊन गेले. मात्र, कल्याण डोंबिवली हा देखील शिवसेनेचा बालेकिल्ला असून येथे बंडानंतर प्रथमच रश्मी ठाकरे या येणार असून आता येथे शिवसैनिकांना त्या काय आव्हान करतात हे पाहावे लागेल.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कल्याण जिल्हा महिला आघाडीच्या कल्याण जिल्हा संघटक विजया पोटे यांच्यावतीने कल्याण पश्चिम मतदारसंघात 'श्रावणसरी' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी आचार्य अत्रे रंगमंदिरात असणाऱ्या या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून रश्मी ठाकरे(Rashmi Thackeray) या उपस्थित राहणार आहेत. त्याविषयीचे बॅनर कल्याण शहरात लागले असून ते लक्ष वेधून घेत आहेत.
या मतदारसंघात लागलेले शिवसेना ठाकरे गटातील रश्मी ठाकरे यांचे बॅनर सध्या लक्षवेधी ठरत आहेत. शिंदे यांच्या बंडानंतर ठाणे येथे उद्धव ठाकरें(Uddhav Thackeray) सह रश्मी ठाकरे येऊन गेल्या आहेत. मात्र, कल्याण डोंबिवली हा देखील शिवसेनेचा बालेकिल्ला असून येथे बंडानंतर प्रथमच रश्मी या येणार असून आता येथे शिवसैनिकांना त्या काय आव्हान करतात हे पाहावे लागेल.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात विविध कार्यक्रम घेण्यास राजकीय पक्षांनी सुरुवात केली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या वतीने नुकतेच मंगळागौर कार्यक्रमांचे ठिकठिकाणी आयोजन करत त्या कार्यक्रमांस मुख्यमंत्री शिंदे यांची पत्नी लता शिंदे व सून वृषाली शिंदे यांनी उपस्थिती लावत मतदारसंघ पिंजून काढला होता. कल्याण पश्चिम मतदारसंघ हा सध्याच्या घडीला शिवसेनेचा बालेकिल्ला बोलला जातो. येथील आमदार विश्ननाथ भोईर हे शिंदे गटात सामील आहेत.
कल्याण पश्चिम हा 2009 च्या मतदारसंघ फेररचनेनंतर अस्तित्वात आलेला नवा मतदारसंघ आहे. या मतदारसंघाची ओळख शिवसेनेचा बालेकिल्ला अशी असली तरी 2009 ला मनसेचे प्रकाश भोईर यांनी शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार राजेंद्र देवळेकर यांचा पराभव करत विजय मिळविला होता.
तर 2014 ला शिवसेना भाजपमधील युती तुटली. भाजपचे नरेंद्र पवार यांनी त्यावेळी शिवसेनेचे विजय साळवी यांचा पराभव करत विजय मिळविला होता. 2019 च्या निवडणूकीत आधी भाजपच्या वाट्याला कल्याण पश्चिम जागा सोडण्यात आली. त्यानंतर शिवसेनेच्या आग्रहाखातर ही जागा शिवसेनेला सोडण्यात आली व येथे विश्वनाथ भोईर यांचा विजय झाला होता.
नवरात्रौत्सवादरम्यान रश्मी ठाकरे यांनी देखील टेंभी नाका येथील देवीचे दर्शनासाठी उपस्थिती लावली होती. ठाणे प्रमाणेच कल्याण डोंबिवलीत देखील शिवसेनेचे वर्चस्व आहे, मात्र येथे ठाकरे परिवाराने आत्तापर्यंत उपस्थिती लावली नाही. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर कल्याण मधील शिवसैनिकांनी हा ठाकरे यांना मोठ्या प्रमाणात पाठींबा दर्शविला होता. कल्याण येथील शिवसेनेच्या शाखांवर शिंदे गटाकडून कब्जा करण्यात येत असताना कल्याण येथे शिवसैनिकांनी जोरदार विरोध केल्याचे पाहायला मिळाले. मात्र येथील शिवसैनिकांच्या भेटीसाठी आत्तापर्यंत ठाकरे परिवारातील कोणतीही व्यक्ती आली नव्हती.
आता मात्र श्रावणसरीच्या कार्यक्रमानिमित्त रश्मी ठाकरे या कल्याणच्या ऐतिहासिक नगरीत एन्ट्री करणार आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून मंगळागौर चे आयोजन कल्याण लोकसभा मतदार संघात शिंदे यांची पत्नी व सूनेने या कार्यक्रमांना उपस्थिती लावत हा मतदार संघ पिंजून काढला आहे. या कार्यक्रमांच्या निमित्ताने शिंदे गटाकडून शक्तिप्रदर्शन देखील करण्यात आले आहे.
ठाकरे गट देखील मागे राहिला नसून या गटाकडून देखील महिला मतदारांना खूश करण्यासाठी श्रावण सरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याण पश्चिम मतदार संघातून या उपक्रमास सुरुवात होत असून रश्मी यावेळी कार्यकर्त्यांना काय आव्हान करतात हे पाहावे लागेल.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.