Eknath Shinde News : AU विरुद्ध ES राजकारण तापले : शिंदेंचे, राऊतांना प्रत्युत्तर; प्रकरण काय?

Eknath Shinde News : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणात AU म्हणजे कोण? या प्रश्नावरुन राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे.
Eknath Shinde, Sanjay Raut
Eknath Shinde, Sanjay RautSarkarnama
Published on: 
Updated on: 

Eknath Shinde News : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणात AU म्हणजे कोण? या प्रश्नावरुन राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपकडून ए. यू म्हणजे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) असा आरोप केला जात आहे. तर या आरोपांवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकणात एसआयटी ची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. Eknath Shinde News

ए. यू चा हा वाद सुरु असतानाच ठाण्यातील बिल्डर सुरज परमार यांच्या डायरीतील ES म्हणजे कोण? या प्रश्नावरुनही राजकारण तापू लागले आहे. याच प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली. त्यांच्या मागणीला दुजोरा देत खासदा संजय राऊत यांनीही एसआयटी चौकशीची मागणी केली.

Eknath Shinde, Sanjay Raut
मुख्यमंत्री शिंदेंनतर अब्दुल सत्तार अडचणीत; न्यायालयाचे कठोर ताशेरे : पुन्हा भूखंड घोटाळा?

सावंत यांनी एक विषय मांडला. ठाण्यातील एक बिल्डर 'सुरज परमार' यांच्या आत्महत्येनंतर जी डायरी सापडली त्या डायरीत सांकेतिक नावे आहे. ती नावे कोणाची आहेत ती आम्हाला माहिती आहे. लावा त्यांच्याविरोधात एसआयटी चौकशी, असे आव्हान राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिले.

Eknath Shinde, Sanjay Raut
सरपंचपदाला पराभूत होऊनही उमेदवाराचा सत्कार; गावकऱ्यांनी दिली तब्बल ३१ लाखांची भेट

दरम्यान, या आरोपांवर औरंगाबाद येथ बोलताना शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. यावेळी शिंदे म्हणाले, ही मागणी म्हणजे त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. सगळ्या चौकशांना आम्ही सामोरे जाऊ शकतो. आमचे सरकार पारदर्शक आहे. ठाकरे गटाला फक्त राजकारण करायचे आहे. भूखंड प्रकरणात आरोप केला होता, त्यात ते तोंडघशी पडले, असा दावा मुख्मयंत्र्यांनी केला. न्यायालयाने त्यांना जागा दाखवली आहे. असे सांगत शिंदे यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com