मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठणठणीत; दोन महिन्यांनी पहिला फोटो आला समोर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी रविवारी वर्षा निवासस्थानी सुभाषचंद बोस आणि बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन केले.
Uddhav Thackeray, Aditya Thackeray
Uddhav Thackeray, Aditya Thackeraysarkarnama
Published on
Updated on

मुंबई : गेल्या अनेक दिवसापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या प्रकृतीबद्दल राजकीय वर्तूळात विविध चर्चा सुरु होत्या. काही दिवसांपूर्वी मानदुखीचा त्रास झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेनंतर ठाकरे यांना डॅाक्टरांनी विश्रांती करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे ते काही दिवस घरीच आराम करत होते.

Uddhav Thackeray, Aditya Thackeray
बाळासाहेबांनी जगाला देशाची हिंदू राष्ट्र म्हणून ओळख करुन दिली : संजय राऊत

मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीवरुन टीका टिप्पणी सुरु होती. मुख्यमंत्री सक्रीय कधी होणार असा प्रश्ना विरोधकांकडून विचारला जात होता. आज नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी रविवारी वर्षा निवासस्थानी सुभाषचंद बोस आणि बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन केले. अभिवादन करतानाचा मुख्यमंत्र्यांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी प्रकृती आता उत्तम असल्याचे सांगितले जात आहे. तसचे विरोधकांनाही त्यांनी आपल्या या फोटोच्या माध्यमातून एक प्रकारे उत्तरच दिले आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते झोपून आहेत. त्यांना आधार घेऊनच चालावे लागते, अशा अनेक वावड्या राजकीय वर्तुळात उठवल्या जात होत्या. मात्र, या वावड्यांना ठाकरेंच्या आजच्या फोटोमुळे पूर्णविराम मिळाला आहे. तसचे मुख्यमंत्र्यांची प्रकृती उत्तम असल्याचे दिसून येत आहे.

Uddhav Thackeray, Aditya Thackeray
आदित्य ठाकरेंनी जागवल्या बाळासाहेबांच्या आठवणी

दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीवरुन टीका करणाऱ्या विरोधकांना चांगलेच सुनावले. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांची प्रकृती उत्तम आहे. विरोधकांना त्यांची अधिक चिंता वाटते, असा चिमटा त्यांनी काढला. मुख्यमंत्र्यांविषयी ते नेहमी बोलत असतात, विरोधी नेत्यांच्या बिघडलेल्या प्रकृतीची ही लक्षणे आहेत. मुख्यमंत्री शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतील, राज्याचे प्रमुख म्हणून जनतेशी संवाद साधतील आणि शिवसेनेच्या राजकारणाची पुढची दिशा देखील ठरवलील. भूमिकाही मांडतील, असे राऊत यांनी सांगितले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आज जनतेशी संवास साधणार असल्याचे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com