अडिच महिन्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) शिवाजीपार्कवर झालेल्या प्रजासत्ताक दिन (Republic Day) समारंभाला हजर झाले.
Cm Uddhav Thackeray
Cm Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) आज (ता.26 जानेवारीला) शिवाजीपार्कवर झालेल्या प्रजासत्ताक दिन (Republic Day) समारंभाला हजर झाले. वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण झाल्यानंतर ठाकरे व पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह शिवाजी पार्कला (Shivaji Park) हजर झाले. राज्यपाल भगतसिंह कोशियारी (Bhagat singh Koshyari) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या सोहळ्यात त्यांनी मानवंदना स्वीकारली. अडिच महिन्यापूर्वी पाठीवर ताण आल्याने कराव्या लागलेल्या मणक्याच्या शस्त्रक्रीयेनंतर ते सार्वजनिक कार्यक्रमाला प्रथमच हजर झाले. त्यानंतर लगेचच निर्भया या महिला पोलिस पथकाच्या कार्यक्रमाला त्यांनी आभासी हजेरी लावली.

Cm Uddhav Thackeray
'मोदी सरकारला बाळासाहेबांना भारतरत्न व पद्मविभूषण का द्यावे वाटले नाही?'

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याहस्ते ते पालकमंत्री असलेल्या मुंबई उपनगर मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी जिल्हाधिकारी निधी पांडे (Nidhi Panday) उपस्थित होत्या. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिव्यांग तसेच, पुरस्कारप्राप्त नागरिकांचा सत्कार झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे गेले काही दिवस कार्यक्रमांना, बैठकांना ऑनलाईन हजेरी लावत होते. आज (ता.26 जानेवारी) ते प्रथमच कार्यक्रमाला प्रत्यक्ष हजर झाले असून आता ते अॅक्शन मोडमध्ये आल्याचे आदित्य यांनी सांगितले.

Cm Uddhav Thackeray
प्रकाश धारिवाल म्हणतात...'अशोक पवार आमदार म्हणजे मीच आमदार आहे'

दरम्यान, मुंबई, मालाड येथील क्रिडागंणाला टिपू सुलतान यांचे नाव देण्याच्या विषयावर माध्यम प्रतिनिधीने विचारलेल्या प्रश्नावर बोलतांना अदित्य यांनी अद्याप नामकरणाबद्दल कोणताही अंतिम निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. गेल्या अडिच महिन्यामध्ये मुख्यमंत्री ठाकरे हे मणक्याच्या शस्त्रक्रीयेमुळे घराबाहेर पडत नव्हते. यामुळे भाजपकडून सातत्याने शिवसेना व ठाकरे यांच्यावर टीका करण्यात येत होती. मात्र, आता त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने ते पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. यामुळे आता ते भाजपला कश्याप्रकारे उत्तरे देतात याकडे लक्ष असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com