Chief Ministers Secretariat : मोठी बातमी! मुख्यमंत्री सचिवालयाकडून तक्रार, जनतेच्या निवेदनांवर मुख्यमंत्री शिंदेंची बनावट सही

Fake signature of Chief Minister Shinde : प्राप्त माहितीनुसार या प्रकाराची मुख्यमंत्र्यांनीही गंभीर दखल घेतली आहे.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeSarkarnama

Mumbai News : मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त झालेल्या दहा ते बारा निवेदनांवर चक्क मुख्यमंत्र्यांची बनावट स्वाक्षरी आणि संशायस्पद शिक्के आढळून आल्याचा प्रकार समोर आला आहे. सचिवालयातील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी तातडीन वरिष्ठांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. प्राप्त माहितीनुसार या प्रकाराची मुख्यमंत्र्यांनीही(Eknath Shinde) गंभीर दखल घेतली असून, तत्काळ यासंबंधी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

CM Eknath Shinde
Thackeray faction VS Shivsena : ठाण्यात राजकारणाला जोड 'जल'कारणाची; शिवसेनेच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक

मुख्यमंत्री सचिवालयास नियमितपणे मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी आणि शेरे असणारी विविध निवेदनं आणि पत्र पुढील कार्यवाहीसाठी प्राप्त होत असतात. पुढे या निवेदनांची टपाल शाखेत नोंद होते आणि नंतर ई ऑफिस प्रणाली नोंद करून संबंधित विभागांना पाठवली जातात.

याप्रकरणी मरीन लाईन्स पोलिस(Mumbai Police) ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सचिवालयातील कर्मचाऱ्यांनी अधिक सतर्क राहून काम करावे, अशाही सूचना दिल्या गेल्या आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

CM Eknath Shinde
Thackeray Faction News : कल्याण लोकसभा मतदारसंघाबाबत सुषमा अंधारे यांचे सूचक विधान

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com