Phaltan : दिंगबर आगवणेंसह सात जणांवर मोक्काची कारवाई

Digambar Agawane आगवणे व संबंधितांवर जमिनी बळकावणे, बनावट सह्या करुन बनावट कर्ज काढणे, खंडणी, अपहरण, दहशत पसरवीने, खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणे, आदी गंभीर गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल आहेत.
Digamber Agawane
Digamber Agawanesarkarnama

Phaltan News : गिरवी (ता. फलटण) येथील दिगंबर आगवणे Digambar Agawane, त्यांची पत्नी सौ. जयश्री आगवणे व अन्य पाच जण अशा एकुण सात जणांवर मोक्कान्वये कारवाई करण्यात आली आहे.

दिगंबर रोहिदास आगवणे, त्यांची पत्नी जयश्री दिगंबर आगवणे, स्नेहल रविंद्र बनसोडे (तिघेही रा. गिरवी ता. फलटण), आदिनाथ काशीनाथ मोटे (रा. सरडे, ता. फलटण), नितीन कालीदास करे रा. वाठारस्टेशन, ता. कोरेगाव), सागर गायकवाड रा. आसू ता. फलटण), अनिल रामचंद्र सरक रा. नांदल, ता. फलटण) अशा सातजणांवर विशेष पोलिस महानिरीक्षकांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये मोक्काची कारवाईस मंजुरी दिली आहे.

दिगंबर आगवणे व संबंधितांवर बनावट कागदपत्रे तयार करुन बेकायदेशीर व गैरमार्गाने जमीनी बळकावणे, बनावट कंपन्या स्थापन करुन बँक अधिका-यांना हाताशी धरुन बँकांकडुन कोट्यावधी रुपयांची कर्ज प्रकरणे मंजुर करुन घेणे, बनावट सह्या करुन बनावट कर्ज काढणे, खंडणी, अपहरण, दहशत पसरवीने, खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणे, आदी गंभीर गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल आहेत.

Digamber Agawane
फलटणला दिगंबर आगवणे भाजपकडून रिंगणात

पोलिस अधीक्षक समिर शेख यांनी कार्यभार स्वीकारताच सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर लक्ष केंद्रीत करुन दहशत व आर्थिक फायद्याकरीता संघटीतपणे गुन्हे करणा-या गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये प्रभावी कारवाई करण्याची सूचना सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांना दिल्या होत्या.

Digamber Agawane
Phaltan : वय कमी करून भरतीचे अमिष; फलटण, माणमधील दोघांवर गुन्हा

त्यानुसार फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी या संबंधितांविरुध्द विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे मोक्कांतर्गंत कारवाईचा प्रस्ताव तयार करुन पाठवला होता, त्यास फुलारी यांनी मंजुरी दिली. मोक्का कायद्याची कलमे लावुन या गुन्ह्याचा तपास फलटणचे पोलिस उपअधिक्षक तानाजी बरडे यांच्याकडे देण्यात आला आहे.

Digamber Agawane
Phaltan : रामराजेंचा 'हा' निर्णय धाडसी... शरद पवार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com