Video Thackeray Vs Shinde : शिवीगाळ, दमदाटी अन्...; मुंबईतील प्रभादेवीत ठाकरे अन् शिंदेंचे पदाधिकारी भिडले, नेमकं घडलं काय?

Thackeray Vs Shinde Shivsena : आमदार सदा सरवणकर यांच्या खर्चातून बोर्ड बसविण्यात आला होता. त्यावरील धनुष्यबाण चिन्ह हटविल्यानंतर ठाकरे गट अन् शिंदेंचे पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार राडा झाला.
clash between thackeray vs shinde worker.jpg
clash between thackeray vs shinde worker.jpgsarkarnama
Published on
Updated on

मुंबईतील प्रभादेवीत शिवसेनेचे ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा भिडले आहेत. फूटपाथवर लावलेल्या बोर्डावरील 'धनुष्यबाण' चिन्ह ठाकरे गटाच्या पधिकाऱ्यानं काढल्याचा आरोप शिंदे गटानं केला. धनुष्यबाण चिन्ह काढल्यानंतर शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ आणि दमदाटी केली आहे.

पुण्यातीत मेळाव्यात शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी शिवसैनिकांना एक आदेश दिला होता. शाखा-शाखांवर असलेल्या बोर्डावरील 'धनुष्यबाणाची' निशाणी आहे, ती हटवा आणि त्याठिकाणी 'मशाल' चिन्ह लावा, असा आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकारी आणि शिवसैनिकांना दिला होता.

clash between thackeray vs shinde worker.jpg
Shivsena News : ठाकरेंच्या वकिलांचं मोठं विधान; ...म्हणून आमदार अपात्रतेआधी शिवसेना पक्ष, चिन्हाचा निर्णय लागेल

त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास प्रभादेवीतील आहुजा टॉवर येथील फुथपाथवर असलेलं शिवसेना ( Shivsena ) पक्षाच्या बोर्डावरील 'धनुष्यबाण' हे चिन्ह कापून हटवलं. स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी स्वखर्चातून हा बोर्ड बसविण्यात आला होता.

बोर्डावरील 'धनुष्यबाण' चिन्ह हटविल्याचं निदर्शनास येताच शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना घेरत शिवीगाळ आणि दमदाटी करत जाब विचारला. "बोर्डावरील धनुष्यबाण चिन्ह का कापलं? ******** आताच्या आता वेल्डिंग करून दे. तू गपचूप येऊन चिन्ह का काढलं? चर्चा करायची, बोर्ड कोणाचे आहे, हे चौकशी करायचे," अशा शब्दांत शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यानं ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना झापलं.

clash between thackeray vs shinde worker.jpg
Eknath Shinde : CM शिंदेंची मजबुरी कोणती? भाजप नेत्यांवर टीका झाली की आठवतेय महाराष्ट्राची संस्कृती

यानंतर शिवसेनेचे शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर माहिम पोलिस ठाण्यात ठाकरे गटाचे पदाधिकारी शैलेश माळी, अमर लब्देसह अन्य एकावर अदखपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com