Devendra Fadnavis News : 'सीएम' फडणवीसांचा सर्वात मोठा निर्णय; गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणं हटवणार

Maharashtra Fort Encroachment : काही महिन्यांपूर्वी विशाळगडावरील अतिक्रमणं हटवण्यावरुन मोठा वादंग निर्माण झाला होता. त्याचे पडसाद अद्यापही कायम असून विशाळगडावर तब्बल 5 महिन्यांहून अधिक काळ संचारबंदी लागू होती.
CM Devendra Fadnavis fort  .jpg
CM Devendra Fadnavis fort .jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर एकापाठोपाठ एक धडाकेबाज निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून घेतले जात आहे. असाच एक मोठा निर्णय फडणवीस सरकारनं निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील सर्व गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे 31 मेपर्यंत हटवण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

काही महिन्यांपूर्वी विशाळगडावरील अतिक्रमणं हटवण्यावरुन मोठा वादंग निर्माण झाला होता. त्याचे पडसाद अद्यापही कायम असून विशाळगडावर तब्बल 5 महिन्यांहून अधिक काळ संचारबंदी लागू होती. आता ती काही प्रमाणात शिथील करण्यात आली असून पर्यटकांना सकाळी दहा ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत गडावर प्रवेश दिला जाणार आहे. याचदरम्यान,सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारने गड-किल्ल्यांवरील (Maharashtra Fort) मोठा निर्णय घेताना अतिक्रमण हटवण्याबाबतचे आदेश दिले आहेत. त्याधी सरकारकडून 31 जानेवारीपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांना गड किल्ल्यांवरील असलेल्या सर्व अतिक्रमणांची यादी सादर करायची आहे. त्यानंतर 1 फेब्रुवारी ते 31 मे पर्यंत टप्प्याटप्प्याने अतिक्रमण हटवण्यासंदर्भातली कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

CM Devendra Fadnavis fort  .jpg
Prakash Abitkar : आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापुरातच 'सलमान'ची चर्चा, प्रशासकीय अधिकारीही 'लाभार्थी'

महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर शिवप्रेमी व हिंदुत्त्ववादी संघटनांकडून राज्यातील गड किल्ल्यांवर वर्षानुवर्षे असलेली अतिक्रमणं हटवण्याबाबतची सातत्याने करण्यात येत होती. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता गड किल्ल्यांवरील अतिक्रमणाविरोधात आक्रमक धोरण स्वीकारले आहे.

हे सर्व अतिक्रमणे हटवण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीही नियुक्त करण्यात आली आहे. पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून दक्षता समितीही गठीत करण्यात आली आहे.

CM Devendra Fadnavis fort  .jpg
Morning Oath Ceremony : पहाटेच्या शपथविधीचं षडयंत्र कोणी रचलं?; छगन भुजबळांनी सांगितली इनसाईड स्टोरी

केंद्र 47 आणि 62 राज्य संरक्षित किल्ले महाराष्ट्रात सध्या आहेत.किल्ल्यांच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 11 सदस्यांची एक समिती नियुक्त करण्यात आली आहे. किल्ले विशाळगडावरील अनधिकृत बांधकामे आणि येथील मशीद बांधकामाविरोधात गेल्या अनेक वर्षापासून शिवप्रेमींनी आवाज उठवला होता.

यानंतर विशाळगड मुक्त करण्यासाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलन पुकारले होते. मात्र, या आंदोलनाला गजापूर गावात हिंसक वळण लागल्यानंतर राज्य सरकारने विशाळगडावर संचारबंदी लागू केली होती. गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या संचारबंदीमुळे विशाळगड सह आजूबाजूच्या गावांवर जगण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली होती.

CM Devendra Fadnavis fort  .jpg
Rahul Gandhi Speech : 'राहुल गांधींचे भाषण ऐकून दुधाची बादली पडली, देशद्रोहाचा गुन्हा...' तरुणाने घेतली न्यायालयात धाव

यामुळे चार-पाच दिवसांपूर्वी गडावरील नागरीकांनी संचारबंदी उठवण्याची मागणी करत धरणं आंदोलन केले होते. अखेर सरकारकने याचे गंभीर्याने दखल घेऊन गडावरील संचारबंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com