Mahayuti Government : सत्तेत परतताच फडणवीसांनी आपल्या 'या' खास अधिकाऱ्याकडे दिली सर्वात मोठी जबाबदारी

CM Devendra Fadnavis: भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता.5) महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांनी आपले पुढील 5 वर्षांच्या व्हिजनवर काम सुरू केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभेत निवडणुकीतील अपयशानंतर महायुती सरकारनं विधानसभेला जोरदार मुसंडी मारत महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला.तसेच 230 जागा मिळवत दणदणीत यश मिळवलं. या महायुती सरकार आणि महाराष्ट्राचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) करणार आहेत. यातच आता फडणवीसांनी आपली टीम बांधण्यास सुरुवात केली आहे.यातच त्यांनी शुक्रवारी (ता.6) मोठा निर्णय घेतला आहे.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता.5) महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांनी आपले पुढील 5 वर्षांच्या व्हिजनवर काम सुरू केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती (Mahayuti) सरकारनं महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी श्रीकर परदेशी यांची मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महायुती सरकारमध्ये श्रीकर परदेशी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून काम पाहणार आहे. याआधी त्यांची 12 जुलै 2022 ला शिंदे- फडणवीस सरकारमध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उप सचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

Devendra Fadnavis
Ajit Pawar: मोठी बातमी! शपथविधीनंतर काही तासांतच अजित पवारांना दिल्लीतून सर्वात मोठा दिलासा

श्रीकर परदेशी यांची पीएमओमध्ये प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. यानंतर जून 2021 मध्ये ते पुन्हा महाराष्ट्रात परतले होते. शिवसेनेतील बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. आणि राज्यात एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत सत्तास्थापन केली.या सरकारमध्ये श्रीकर परदेशी यांना उपमुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली.

आता महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर फडणवीसांनी पुन्हा एकदा परदेशी यांच्यावर मोठा विश्वास दाखवत आपल्या प्रशासकीय टीममध्ये परत आणलं आहे.सांगलीतील कवठेमहांकाळ हे श्रीकर परदेशी यांचं मूळ गाव असून त्यांनी एमबीबीएस- एमडीचं शिक्षण घेतलं आहे.

Devendra Fadnavis
Kailas Patil Video : ठाकरेंचा पठ्ठ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भिडला, चॅलेंज देत 'त्या' दाव्यातील हवाच काढली!

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथे श्रीकर परदेशी यांचा जन्म झाला असून त्यांनी एमबीबीएस- एमडीचं शिक्षण घेतलं आहे. त्यांनी 2001 मध्ये पहिल्या प्रयत्नातच यूपीएससी यशस्वी झाले होते. त्यांच्याकडे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्तपद,नांदेडचे जिल्हाधिकारी यांसह विविध मोठ्या पदांवर काम करण्याचा अनुभव आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com