IAS Officer Transfer: 'सीएम' फडणवीसांनी पुन्हा एकदा प्रशासन हादरवलं; 'या' 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश

Mahayuti Government : गेल्याच आठवड्यात राज्य सरकारकडून 9 आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले होते. त्याच्या आधी 13 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले होते. आता पुन्हा नव्यानं एकदा सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहेत.
IAS.jpg
IAS.jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्रात दुसर्‍यांदा सत्तेत आलेल्या महायुती सरकार आल्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका कायम सुरू आहे.नव्या वर्षातील दीड महिन्यांच्या कालावधीतच तिसऱ्यांदा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दोन महिन्यात जवळपास 30 हून अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्या आदेशान्वये महाराष्ट्रातील 7 आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी (ता.25) काढले आहेत.

गेल्याच आठवड्यात राज्य सरकारकडून 9 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले होते. त्याच्या आधी 13 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले होते. आता पुन्हा नव्यानं एकदा सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहेत. यात सारथीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून राजेंद्र निंबाळकर आणि रुसाच्या प्रकल्प संचालकपदी डॉ.राजेंद्र भारुड यांची बदली करण्यात आली आहे.

राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार सत्तेत आल्यापासून प्रशासनात मोठ्या प्रमाणात बदल्यांचा धडाकाच लावल्याचे दिसून येत आहे. गेल्याच आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचे यांच्या मर्जीतले अधिकारी असलेले राजेश देशमुख यांची कोकण विभागीय आयुक्त पदावरुन राज्य उत्पादन शुल्क आयुक्त पदावर बदली करण्यात आली होती.

IAS.jpg
Sushma Andhare On Neelam Gorhe: 'मर्सिडिज' प्रकरण अंगलट; नीलम गोऱ्हेंच्या अडचणी वाढल्या, अंधारेंनी धाडली कायदेशीर नोटीस

बदली झालेले अधिकारी...

1. राजेंद्र निंबाळकर (IAS:SCS:2007) व्यवस्थापकीय संचालक, MSSIDC, मुंबई यांची व्यवस्थापकीय संचालक, सारथी, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

2. संजय यादव (IAS:SCS:2009) जिल्हाधिकारी, मुंबई शहर, मुंबई यांची राज्य प्रकल्प संचालक, समग्र शिक्षा अभियान, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

3. डॉ. राजेंद्र भारुड (IAS:RR:2013) आयुक्त, TRTI, पुणे यांना प्रकल्प संचालक, RUSA, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

4. दीपक कुमार मीना (IAS:RR:2013) अतिरिक्त आदिवासी आयुक्त, ठाणे यांची सहआयुक्त, राज्य कर,मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

5. समीर कुर्तकोटी (IAS:SCS:2013) यांची आयुक्त, TRTI, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

6. महेश आव्हाड (IAS:SCS:2015) व्यवस्थापकीय संचालक, Haffkine Bio-pharma Corporation, Mumbai यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

7. कीर्ती किरण पुजार (IAS:RR:2018) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी यांची जिल्हाधिकारी, धाराशिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com