Sushma Andhare On Neelam Gorhe: 'मर्सिडिज' प्रकरण अंगलट; नीलम गोऱ्हेंच्या अडचणी वाढल्या, अंधारेंनी धाडली कायदेशीर नोटीस

Neelam Gorhe On Uddhav Thackeray and ShivsenaUBT: शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे शिवसेना पक्ष (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य केलं होत. या वक्तव्याप्रकरणीच सुषमा अंधारे यांनी मोठं पाऊल उचललं आहे.
Sushma Andhare And NeelaM Gorhe .jpg
Sushma Andhare And NeelaM Gorhe .jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की, एक पद मिळायचं असा खळबळजनक आरोप केल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.नीलम गोऱ्हेंच्या या विधानानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना चांगलीच संतापली असून त्यांच्याकडून टीकेची झोड उठवली जात आहेत. यातच आता ठाकरे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून थेट अब्रुनुकसानीची नोटीस धाडली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी याप्रकरणी नीलम गोऱ्हे यांना अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस पाठवली आहे.त्यांनी ॲड.असीम सरोदे यांच्यातर्फे नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांना ही नोटीस पाठवली आहे.त्यामुळे आता हे प्रकरण राजकीय वादापुरतं मर्यादित राहिलं नसून कोर्टापर्यंत पोहचलं आहे.या नोटिशीला आता नीलम गोऱ्हे काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वाचं लक्ष लागलेलं आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे शिवसेना पक्ष (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य केलं होत. या वक्तव्यावरून राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. आता याचप्रकरणी सुषमा अंधारे यांनी मोठं पाऊल उचललं आहे.

Sushma Andhare And NeelaM Gorhe .jpg
Indrajit Sawant Case : मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश अन् पोलिस यंत्रणा वेगानं हलली; इंद्रजीत सावंत धमकीप्रकरणी गुन्हा दाखल

तसेच अंधारेंनी ॲड.असीम सरोदे यांच्यातर्फे डॉ.नीलम गोऱ्हेंना नोटीस पाठवण्यात आला आहे.सुषमा अंधारेंनी निलम गोऱ्हे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा देखील केला आहे.सात दिवसाच्या आत नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या वक्तव्या संदर्भात पक्षाची आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची माफी मागावी,अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असं या नोटीसमध्ये म्हटलं आहे.

सुषमा अंधारेंनी सोमवारीच नीलम गोऱ्हेंविरोधात आपण कायदेशीर पाऊल उचलणार असल्याचे संकेत दिले होते. त्यावेळी त्यांनी नीलम गोऱ्हेंना ज्या पक्षाने चारवेळा आमदारकी दिली. त्यांनी त्यांच्या मॉडेल कॉलनी भागात शिवसेनेची एक साधी शाखाही उघडली नाही. त्यांनी माझा शिवसेनेत पक्षप्रवेश होऊ दिला नाही. माझा पक्षप्रवेश होईपर्यंत नीलम गोऱ्हेंच्या कानावर पडू दिलं नाही, असा गौप्यस्फोटही अंधारे यांनी केला होता.

अंधारे म्हणाल्या, शिवसेना पक्षात कुणाला प्रवेश द्यायचा, कुणाला नाही, हे सगळं काम नीलम गोऱ्हे बघायच्या...त्यांनी आमदारकीसाठी मर्सिडीज दिल्या तर त्या कुठून आणल्या? त्यांचा व्यवसाय काय, त्यांची अडीचशे कोटींची संपत्ती कशी काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सुषमा अंधारेंनी या नोटिसमध्ये सात दिवसांच्या आता नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात पक्षाची आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असं म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com