
Mumbai News : महायुती सरकार पुन्हा एकदा धडाक्यात सत्तेत परतलं आहे. या सरकारमधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उर्वरित आमदारांचे शपथविधीही पार पडले आहेत. तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनानंतरही सरकारमधील मंत्रिपदाचा घोळ अद्यापही कायम आहे. वजनदार खात्यावरुन सरकारमध्ये रस्सीखेच सुरू आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) मात्र,आपल्या कामाचा झपाटा लावला आहे. त्यांनी अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सचिव यांना फडणवीसांनी नवे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्री (Chief Minister) देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सरकारची पुढील पाच वर्षांची दिशा स्पष्ट करतानाच अतिरिक्त मुख्य सचिव,प्रधान सचिव आणि सचिव यांना कामकाजाचा मंत्र दिला आहे. पारदर्शकता, गतिशीलता आणि प्रामाणिकता यावर अधिक भर देण्यात यावा असं स्पष्ट केलं आहे. 100 दिवसांचा कार्यक्रम प्रत्येक विभागाने सादर करावा असा आदेशही फडणवीसांनी संबंधित अधिकारी वर्गाला दिले आहेत.
केंद्र सरकारचा पुरेपूर वापर राज्याच्या प्रगतीसाठी करून घ्या, अधिक समन्वय, पाठपुराव्याची व्यवस्था निर्माण करा. यासाठी दिल्ली येथे महाराष्ट्र सदनाच्या माध्यमातून स्वतंत्र कक्ष उभारा. वॉररूम आणखी कार्यक्षम करा. कोणते प्रकल्प त्यात असले पाहिजे,याची नव्याने रचना मुख्य सचिवांनी करावी असेही मुख्यमंत्री म्हणाले.
तसेच पहिली बैठक डिसेंबर अखेरीस व्हावी. एक वॉररूम पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी आहेच, पण दुसरी वॉररूम आता केंद्र आणि राज्य सरकारच्या फ्लॅगशिप योजनांसाठी असेल.त्यातून सर्वसामान्य लोकांपर्यत लाभ गतीने पोहोचले पाहिजे अशा सूचनाही फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जनता दरबार,लोकशाही दिन कार्यक्रम वेगाने हाती घ्या. हे कार्यक्रम सुरू झालेच पाहिजे, ते तळागाळात नेले पाहिजे.आपले सरकार पोर्टल पुन्हा नव्याने पूर्ण क्षमतेने चालवा. पालक सचिवांनी आपल्या जिल्ह्यात प्रवास तत्काळ सुरू करावे. आपल्या अनुभवाचा फायदा त्या-त्या जिल्ह्यांना करून द्या. वेगवेगळ्या विभागाचे पोर्टल अपडेट करा.ते अधिक प्रभावी करा. त्यातून लोकांना शक्य तितक्या सेवा घरबसल्या लोकांना कशा मिळतील, यावर भर दिला पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उत्कृष्ट काम करणाऱ्या विभागांना मंत्रिमंडळ बैठकीत सन्मानित करण्यात येईल. सर्व संकेतस्थळ हे RTI फ्रेंडली करा. 26 जानेवारीपर्यंत यावर टार्गेट करा.'इज ऑफ लिव्हिंग'वर सर्वाधिक भर द्या. सर्वाधिक लोक आपल्याकडे कशासाठी येतात आणि त्यांना त्या सेवा घरबसल्या कशा मिळतील, यावर भर द्या. 6/6 महिन्यांचे दोन टप्पे करून हे उद्दिष्ट गाठायचे आहे. यासाठी माजी अधिकाऱ्यांची समिती गठित करून एक अभ्यास अहवाल तयार करा, असा आदेशही फडणवीसांनी दिले.
कर्मचाऱ्यांच्या तक्रारींकडे प्राधान्याने लक्ष द्या. त्यांचा थेट सचिवांशी संवाद आणि त्यातून त्यांच्या समस्यांचे निराकरण करा. नवीन नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण तातडीने घेऊन त्यांना त्यांच्या जिल्ह्यात पदस्थापना द्या. जेणेकरून त्यांना काम करणे सोपे होईल. महाराष्ट्र हे असीमित ताकदीचे राज्य असून नंबर 1 वर आहोत, पण म्हणून थांबू नका. जुनी पुण्याई असली, तरी नवी पुण्याई पुन्हा मिळवली पाहिजे. तंत्रज्ञानाचा महत्तम वापर करा.सर्व अडचणी दूर करा D
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.