Mahayuti Government: नाही नाही म्हणता मुख्यमंत्र्यांनी शिंंदेंना झटका दिलाच; 'या' महत्वाकांक्षी योजनेलाच कात्री? मोठी माहिती समोर

Eknath Shinde Famous Scheme Aandacha Shidha : राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या आनंदाचा शिधाच्या योजनेच्या माध्यमातून रेशनकार्डधारकांना एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो चना डाळ आणि एक लिटर पामतेल मिळत होतं. पण आता ही योजना आता बंद करण्यात आल्याची चर्चा आहे
Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra FadnavisSakranama
Published on
Updated on

Mumbai News: महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलं आहे.विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या जाहीरनाम्यात घोषणांच पाऊस पाडल्यानंतर प्रचंड बहुमतासह सत्तेत परतलेल्या महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजनेसह अनेक योजनांना कात्री लावण्यात येणार असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सुरू केलेल्या कुठल्याही योजना बंद करणार नसल्याची भूमिका अनेकदा स्पष्ट केली होती. पण 'आनंदाचा शिधा' ही शिंदेंची लोकप्रिय योजनेला फडणवीस सरकारनं ब्रेक लावला असल्याची माहिती समोर येत आहे.

उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवारांनी सोमवारी (ता.10) विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात कृषी,आरोग्य,शिक्षण,व्यापार यांसह विविध क्षेत्रांसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. अशातच लाडकी बहीण योजनांसह सरकारच्या अनेक योजनांसाठी भरघोस आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.पण एकनाथ शिंदेंच्या काळात सुरु झालेल्या आनंदाचा शिधा या लोकप्रिय योजनेसाठी तरतूद करण्यात आलेली नाही.

एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह (Devendra Fadnavis) सत्ताधारी पक्षांच्या नेतेमंडळींकडून सातत्यानं महायुती सरकार कोणत्याही योजना बंद करणार नसल्याच्या दावा करण्यात येत आहे. खुद्द फडणवीसांनीही अनेकवेळा याबाबत खुलासा केला आहे.

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Tukaram Mundhe : मुंडेंच्या राजीनाम्यानंतर 'डॅशिंग' अधिकारी तुकाराम मुंढेंची बीडमध्ये 'एन्ट्री'? गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी फडणवीस मोठा निर्णय घेणार?

राज्याच्या तिजोरीत लाडकी बहीण योजनेमुळे खडखडाट असल्याचा आरोप केला जात आहे.यातच आता आनंदाचा शिधा योजनेसाठी कुठलीही आर्थिक तरतूद सरकारकडून न करण्यात आल्यामुळे ही योजना बंद करण्यात आली की काय अशी चर्चा राज्यभरात सुरु झाली आहे.

आधी लाडकी बहीण योजनेचं 2100 हप्ता न देता महिलांना 1500 दिल्यामुळे सरकारनं आपलं आश्वासन पाळलं नसल्याचा दावा विरोधकांकडून केला जात असून सरकारला सभागृहात कोंडीत पकडण्याचाही प्रयत्नही करण्यात आला. यातच सण उत्सवाच्यावेळी दिला जाणारा आनंदाचा शिधा तळागळापर्यंत पोहचलेली योजना होती. या योजनेचा राज्यातील 1 कोटी 63 लाख लोकांनी लाभ घेतला होता. पण सरकार शिंदेंची ही लोकप्रिय योजनाच गुंडाळण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे.

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Satej Patil Vs Mahayuti: महायुतीकडून काँग्रेसच्या सतेज पाटलांचा 'करेक्ट कार्यक्रम' करण्याचा प्लॅन, पण...

राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या आनंदाचा शिधाच्या योजनेच्या माध्यमातून रेशनकार्डधारकांना एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो चना डाळ आणि एक लिटर पामतेल मिळत होतं. पण आता ही योजना आता बंद करण्यात आल्याची चर्चा आहे. फडणवीस सरकारच्या नुकत्याच सादर झालेल्या पहिल्याच अर्थसंकल्पामध्ये आनंदाचा शिधा योजनेला कात्री लावण्यात आल्याचं दिसून आलं. दसरा, दिवाळी, गुढीपाडवा, आंबेडकर जयंती अशा विविध सणांच्या दिवशी अवघ्या 100 रुपयांमध्ये जीवनावश्यक पाच वस्तू दिल्या होत्या.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com