Nitin Banugade Patil At Miraj Melava: 'शिवसेना संपणारी नाही तर इतरांना संपविणार' ; बानुगडेंचा शिंदे गटावर प्रहार

Shiv Sena Thackeray Group : आगामी लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे गटाचे अस्तित्व काय हे संपूर्ण महाराष्ट्राला कळेल.
Nitin Banugade Patil
Nitin Banugade PatilSarkarnama
Published on
Updated on

Miraj Shivsena Thackeray Group Melava : शिवसेना आता संपणार, उद्या संपणार अशा अनेक वेळा वल्गना करण्यात आल्या. मात्र, शिवसेना ही कधीच संपली नाही आणि संपणार नाही. शिवसेना संपणारी नाही तर इतरांना संपवणारी असल्याचा प्रहार ठाकरे शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी मिरज येथे केला. आगामी निवडणुकीनंतर शिंदे गटाचे अस्तित्व काय हे संपूर्ण महाराष्ट्राला दिसून येईल, असेही त्यांनी सांगितले. (Nitin Banugade Patil At Miraj Melava)

शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा मिरज येथील बालगंधर्व नाट्य मंदिर येथे पार पडला. या कार्यक्रमाला उपनेते प्रा. नितीन बानगुडे-पाटील आणि वरून सरदेसाई उपस्थितीत होते. यावेळी शिवसेनेचे मिरज तालुक्याचे नेते सिद्धार्थ जाधव, जिल्हाप्रमुख संजय विभुते, संजय काटे-पाटील, तानाजी सातपुते, चंद्रशेखर मैगुरे उपस्थित होते. (Miraj Shivsena Thackeray Group Melava)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nitin Banugade Patil
Narendra Modi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मराठी गुरूच्या गावाला भेट देणार? 'स्वाभिमानी'ने पाठवले निमंत्रण

यावेळी बोलतांना बानगुडे-पाटील म्हणाले,'शिवसेना फुटीनंतर शिवसेना किती तरी पटीने वाढली आहे. गद्दारीची सुरुवात जिथून झाली त्या कल्याण मतदार संघात उद्धव ठाकरे यांची सभा झाली. तेथे प्रचंड गर्दी झाली. जे आपल्या विरोधात होते, ते सर्व जातीचे, धर्माचे लोक आता आपल्या बरोबर येत आहेत. आता समीकरणे बदलली आहेत. जाती, धर्म भेद विसरून सर्वजण उद्धव ठाकरे यांच्या बाजूने उभे राहतील. जे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नाव घेऊन मोठे झाले. त्यांनी अखंड महाराष्ट्राची फसवणूक केली आहे. त्यांचे विचार त्यांनाच मातीत काढल्याशिवाय राहणार नाहीत. आगामी लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे गटाचे अस्तित्व काय हे संपूर्ण महाराष्ट्राला कळेल. खरी शिवसेना संपवायच्या नादात स्वतः कसे संपले हे त्यांनाही समजणार नसल्याची टीका त्यांनी केली.' (Nitin Banugade Patil At Miraj Melava)

उपनेते वरून सरदेसाई (Varun Sardesai) म्हणाले, मिरज विधानसभा मतदारसंघ भाजपला सोडून आपल्याकडून मोठी चूक झाली होती. ज्यांना आपण मोठे केले तेच आपल्या डोक्यावर बसले. मिरज मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी होम वर्क करण्याची गरज आहे. आपण मिरज विधानसभा कशी जिंकू, त्याचा अभ्यास केला पाहिजे. उमेदवार कोणीही असो, त्याला निवडून कसा आणायचा हे बघितले पाहिजे. मिरजेतील सर्व 161 बूथवर शिवसैनिकांची (Shivsena) नेमणूक केली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत यापुढील काळात मिरज मतदारसंघ आपण काबीज करण्यासाठी पाऊले टाकावीत. त्यासाठी कार्यकर्त्यांना बळ देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. (Shiv Sena Thackeray Group)

Edited By: Rashmi Mane

Nitin Banugade Patil
Satara News: सातारा लोकसभेला महायुतीत ट्विस्ट;गोरेंनी वाढवलं भोसलेंचं टेन्शन; उदयनराजे अडचणीत...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com