CM Eknath Shinde Press : सोन्याचा चमचा घेऊन जन्माला..; ठाकरेंना शिंदेंचा टोला ...पाहा VIDEO

Maharashtra politics Shinde Remark on Thackeray: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लाडकी बहाणी योजनेवरून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोला लगावला.
CM eknath shinde
CM eknath shindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महायुतीला निवडणुकीत अभुतपूर्व यश मिळाल्याने, मुख्यमंत्री कोण? यावरून भाजप आणि शिवसेना पक्षात रस्सीखेच सुरू आहे. एकनाथ शिंदे नाराज असल्याचे सांगितले जात होते. यातच त्यांचे तीन दिवसांपासूनचे मौन महायुतीचे टेन्शन वाढवले होते. भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित असून भाजप आमदारांनी ते उचलून धरले आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या निकालानंतर तब्बत तीन दिवसानंतर माध्यमांसमोर आले. विधानसभा निवडणुकीत न थांबता केलेल्या प्रचारातील धावपळ सांगताना महायुती सरकारने दिलेल्या लाडकी बहीणसह इतर योजनांवर विरोधकांकडून होणाऱ्या टीकेवर भाष्य केले. यात उद्धव ठाकरेंना त्यांनी नाव न घेता टोला लगावला.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, "महायुती सरकारचा प्रमुख म्हणून काम करताना कधीही मुख्यमंत्री म्हणून काम केले नाही. एक कार्यकर्ता म्हणून काम केले. महायुती सरकारच्या माध्यमातून जनतेसाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबवत्या आल्या.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनांमुळे मी राज्यातील बहिणांचा लाडका भाऊ झालो. या बहिणींसाठी मी सदैव्य काम करत राहणार आहे". सर्वसामान्य जनतेला सरकारी योजनांचा लाभ देताना, विरोधकांनी अडथळे आणले. न्यायालयात गेले. त्यावर मात करून बहिणींना लाभ दिला. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना गरिबी काय कळेल, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता लगावला.

CM eknath shinde
Sanjay Shirsat : राजकारणात काही फिक्स नसतं, शिरसाट यांनी भाजपची वाढवली धाकधूक ...पाहा VIDEO

'मुख्यमंत्रीपदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल. महायुतीने आम्हाला राज्यात काम करण्याची मोठी संधी दिली. तसेच राज्यात महायुतीचा मुख्यमंत्री करण्याचे बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न देखील मोदी-शाह यांनी स्वप्न पूर्ण केले. त्यामुळे भाजपच्या मुख्यमंत्र्यांला आमचं समर्थन असेल', असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.

CM eknath shinde
Eknath Shinde PC : महायुतीच्या ग्रँड विजयाची एकनाथ शिंदेंनी सांगितली दोनच कारणं

लाडका भाऊ म्हणून राज्यात ओळख

गेल्या अनेक वर्षात असा विजय मिळाला नाही, तेवढा मोठा विजय महायुतीने मिळवला आहे. या निकालातून लोकांनी महायुतीवर विश्वास दाखवला आहे. महाविकास आघाडीने जी विकासकामे थांबवली होती, ती आम्ही पुढे नेली. कल्याणकारी योजना आणि विकास कामांची सांगड घातल्याने विजय झाला. हा जनतेचा विजय आहे.

महायुतीच्या विजयात कार्यकर्त्यांनी प्रचंड काम केले. यातून लाडकी बहिणींचा लाडका भाऊ म्हणून राज्यात ओळख निर्माण झाल्याचा आनंद आहे. आम्ही जे केले ते लोकांसाठी केले. रक्ताच्या शेवटचा थेंब असेपर्यंत मी जनतेसाठी काम करेल. मला काय मिळाले, त्या पेक्षा जनतेला काय मिळाले हा आमचा उद्देश होता, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

राज्यात तब्बल 90च्या वर सभा

निडवणुकीच्या काळात पहाटपर्यंत काम केले. पायाला भिंगरी लावून राज्यात फिरलो. राज्यात तब्बल 90च्या वर सभा घेतल्या. हजारो किलोमीटरचा प्रवास झाला. मुख्यमंत्रीऐवजी कार्यकर्ता म्हणून काम केले. आजही कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. स्वतःला कधीही मुख्यमंत्री समजले नाही. आजही कॉमन मॅन म्हणून काम करत आहे. त्यामुळे प्रोटोकॉलचा अडथळा आला नाही, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com