Eknath Shinde : फ्रीजमधले खोके कोणी पचवले, हे ते जनतेसमोर येईल ; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना इशारा

Eknath Shinde : मोठे मोठे खोके घेण्याची ऐपत आमदारांची आहे का?
Uddhav Thackeray| Eknath Shinde|
Uddhav Thackeray| Eknath Shinde|sarkarnama

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (शनिवारी) आपल्या आमदारांसह गुवाहाटी येथे जाऊन कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. ते आज (रविवारी) गुवाहाटीवरुन मुंबईत आले. त्या आधी मुख्यमंत्र्यांनी गुवाहाटी विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला.

"फ्रीजमध्ये भरून कुठे खोके गेले?," अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली होती. त्याला शिंदेंनी प्रत्युत्तर दिले आहे. ( knath Shinde latest news)

"आम्ही जे करतो ते खुलेआम करतो लपूनछपून करत नाही.काही लोकं लपून छपून करतात. परंतु लपून छपून केलेली काम उजेडात येतात आणि लोकांना माहित पडतात. त्यांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावं. त्यांनी एकचं वक्तव्य केलं की, फ्रीजमध्ये भरून कुठे खोके गेले? असं म्हटलं. आता मी शोध घेतो आणि नंतर त्यावर बोलतो," असा टोला मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना हाणला आहे.

"आता हे जे बोलतायत ते छोटे मोठे खोके आहेत. मोठे मोठे खोके घेण्याची ऐपत आमदारांची आहे का? मोठे मोठे खोके फ्रीज भरून खोके,फ्रीज एवढ्या कंटेनरमधले खोके कोणाकडे गेले आणि कोणी पचवले हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे आणि ते जनतेसमोर येईल," असा गौप्यस्फोट शिंदेंनी यावेळी केला.

Uddhav Thackeray| Eknath Shinde|
Sushama Andhare : नितू-निलू आमचे भाचे आगाऊ लेकरं..; अंधारेंनी उडवली राणे पिता-पुत्रांची खिल्ली

राज्यात एक सकारात्मक दृश्य तयार झाले आहे. त्यांच्या छातीत धडकी भरली आहे. त्यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत, त्या धक्क्यातून ते सावरले नाहीत, म्हणून अशाप्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून केले जात आहे. यापूर्वी नैराश्याचे वातावरण होते, पण आम्ही नवीन सरकार बनवल्यानंतर ते बदलले. जनमत आमच्या सरकारबद्दल चांगलं आहे, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे,असे शिंदे म्हणाले.

Uddhav Thackeray| Eknath Shinde|
Sanjay Raut : महाराष्ट्राला नामर्द बनविण्याचे भाजपचं कारस्थान ; राऊतांचा हल्लाबोल

"उद्धव ठाकरेंकडून काय अपेक्षा करणार, त्यांची मानसिकता ढसळली आहे, त्यांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे, नैराश्येतून त्यांच्याकडून अशाप्रकारचे वक्तव्य करत आहेत," असे मुख्यमंत्री म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com