Thackeray Shivsena : ठाकरेंची शिवसेना लागली विधानसभेच्या कामाला; पूर्व विदर्भातील 14 जागांवर दावा, सक्षम उमेदवारांची चाचपणी

Maharashtra Assembly Election 2024 : काही जागा आदलाबदल करून तिथे सक्षम उमेदवार आहेत का? याची चाचपणी करण्यासाठी आढावा बैठक घेतल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

Nagpur, 16 June : पूर्व विदर्भातील विधानसभेच्या 14 जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दावा केला आहे. पूर्व विदर्भाचे संपर्क नेते आमदार भास्कर जाधव यांनी त्या 14 जागांचा आढावा घेण्याचे काम करत आहोत. काही जागा आदलाबदल करून तिथे सक्षम उमेदवार आहेत का? याची चाचपणी करण्यासाठी आढावा बैठक घेतल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) हे पूर्व विदर्भाच्या (Vidarbh) दौऱ्यावर आहेत. त्या वेळी त्यांनी आपल्या दौऱ्याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, पूर्व विदर्भाची जबाबदारी माझ्याकडे सहा महिन्यांपूर्वीच देण्यात आली होती. रामटेक लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे (Shivsena) राहू द्यावा, यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) ती मित्रपक्ष काँग्रेसला सोडावी लागली.

पाच लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघाची संख्या 28 इतकी आहे. त्यातील 14 जागा काम करण्यासाठी आम्हाला मोकळ्या झाल्या आहेत. संभाव्य उमेदवार, इच्छुक उमेदवार यांची माहिती गोळा करून त्याचा अभ्यास आणि अहवाल तयार करून उद्धव ठाकरे यांना सोपवणार आहे, असे भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले

नागपूर शहरातील विधानसभेच्या जागांपैकी पूर्व नागपूर, दक्षिण आणि मध्य नागपूर, नागपूर ग्रामीणमध्ये हिंगणा, रामटेक, कामठी उमरेड या जागेवर विचार होईल. सहापैकी दोन जागेवर काँग्रेस निवडून आली आहे, त्यामुळे उर्वरित जागेवर आम्ही क्लेम करणार आहोत, असेही भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले.

आम्ही लोकसभेच्या निवडणुका महाविकास आघाडीतर्फेच लढवणार आहोत, हे उद्धव ठाकरे यांनीच जाहीर केले आहे. पण, प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो. आमच्यासारख्या नेत्यांचं ते काम आहे. आम्ही महाविकास आघाडीतून लढू, असा विश्वासही जाधव यांनी दिला.

Uddhav Thackeray
Kalyan Kale Vs Raosaheb Danve : खासदार काळेंनी दंड थोपटले, तिथेच रावसाहेब दानवेंचा आज दौरा...

‘महाविकास आघाडीत आम्ही अनेक जागा सोडल्या’

भास्कर जाधव म्हणाले, लोकसभेची पाच वेळा निवडून आलेली रामटेकची पारंपरिक जागा आम्ही सोडली. कोल्हापूरची जागा आम्ही सोडली. अमरावतीची जागा आम्ही सोडली. अनेक जागा आम्ही सोडल्या आहेत. त्याची नोंद महाराष्ट्राच्या जनतेकडे आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडेसुद्धा नोंद आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही.

‘शिवसेना सोडली नसती तर वरच्या पदावर गेला असता’

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ राज ठाकरेंच्या बाबतीत जे बोलले, ते मलाही बोलले होते. तू जर शिवसेना सोडली नसती, तर तू वरच्या पदावर गेला असता. हे त्यांचे मत आणि मन आहे. आमच्याविषयी त्यांना वाईट वाटतं; म्हणून ते बोलले. त्यात भुजबळ यांचा वाईट हेतू होता, असं काही नाही.

ईव्हीएम हॅक करण्यात भाजपचा हातखंडा

रवींद्र वायकर यांच्या मेहुण्याकडे ईव्हीएम मशीनला जोडण्यात आलेला मोबाईल फोन होता, हे स्पष्ट झाले आहे. ईव्हीएम हॅक करणे, हा भाजपचा हातखंडा आहे, त्याचबरोबर भाजपचे सैनिक एकनाथराव शिंदे, रवींद्र वायकर ही गॅंग आहे, असा आरोपही जाधव यांनी केला.

Uddhav Thackeray
Sachin Kalyanshetti Vs Praniti Shinde : ‘प्रणितीताई, शब्द जपून वापरा; आम्ही बोलायला लागलो तर खूप महागात पडेल’; कल्याणशेट्टींचा इशारा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com